कविता 

पक्षांची ऑनलाइन शाळा

पक्षांची ऑनलाइन शाळा🦜🦜🦜🦜🦜🕊️🕊️🕊️🕊️🐥🐥

लोक डाऊन मुळे आता
सगळेच लॉक झाले
चिव- चिव करून🐥
शाळा भरवनारे पक्षी

सुद्धा शांत,उदास झाले
चिमण्या कावळे साळुंकी
कबूतर कोकिळेचा आवाज
दुर्मिळ झाला ,कोरोनाच्या
महामारी ने जणू सुरेल ध्वनी
बंद झाला ।इकडे तिकडे
विखरून पक्षी राहू लागले
जनु माणसासारखे
आता वागु लागले।

एकदा सर्व पक्षांनी भरवली
तारावर ऑनलाइन शाळा
पक्षांचा थवा ऑनलाइन
आकाशात उडू लागला
घरटे तयार करण्यासाठी
जागा शोधू लागला
आकाशातून माणसांचे
हाल पाहू लागले

कधी वादळ ,कधी वारा
कधी महापुराचे थैमान
शेतकऱ्यांची रास पाण्यात
वाहताना पाहू लागले
अशाप्रकारे पक्षांची
ऑनलाइन शाळा सुरू झाली माणसांचे हाल उघड्या
डोळ्यांनी पाहू लागली

देवा सर्वांना सुबुद्धी दे
सर्वांचं भलं कर
कल्याण कर सर्वांना
सुखी ठेव अशी
प्रार्थना करू लागले।🙏🏻🙏🏻

*कवि:-
श्री देविदास पांचाळ सर
श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर. जिल्हा उस्मानाबाद.

Related posts