तुळजापूर

शंभूसेने कडून एक हात मदतीचा मोहीम

परंडा प्रतिनिधी/ पुरूषोत्तम विष्णु बेले –
राज्यभरात तब्बल १२ तासापेक्षा अधिक काळापासून पाऊस कोसळत आहे तसेच हवामान खात्याच्या अंदाजपत्रकानुसार आणखी पुढील २ दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. परंडा तालुक्यातील जवळपास सर्वच तलाव परतीच्या पावसाने भरगच्च भरलेले असून त्यालगतच्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.या आपत्कालीन काळामध्ये शंभूसेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एक हात मदतीचा ही मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी खबरदारी घेतली पाहिजे. मातीचे बांधकाम असलेली घरे असणाऱ्या व्यक्तींनी दक्षता घ्यावी.
तसेच ओढा,नदी,पाटबंधारे,धरण इ. धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे.
सखल भागातील घरामध्ये पाणी जाण्याची शक्यता असते त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू विजेच्या स्विचपासून दूर करून उंच ठिकाणी ठेवाव्यात.त्याचप्रमाणे विजांचा कडकडाट सुरू असताना भ्रमणध्वनीचा(मोबाईल) वापर टाळावा.नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे.तसेच अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे. अफवांवर विश्वास ठेवू नका.असे आवाहन शंभूसेना महाराष्ट्र राज्य उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष तथा श्रीमंतराजे प्रतिष्ठाण अध्यक्ष रणजीत महादेव पाटील यांनी केले आहे.तसेच कोणी आपत्कालीन परिस्थितीमध्ये असेल तर मदतीसाठी 9767373505 या नंबरवर संपर्क करा असे रणजीत पाटील यांनी सांगितले.

Related posts