उस्मानाबाद  तुळजापूर

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने किरीट सोमय्या च्या निषेधार्थ निदर्शने व जोडेमारो आंदोलन.

तुळजापूर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तुळजापूर पक्षाच्या वतीने किरीट सोमय्या विरोधात जोडे-मारो आंदोलन करत जाहीर तीव्र निषेध व्यक्त केला. लंपट सोमय्याच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी हाणले जोडे.

माहिती अधिकार फेम भाजप नेता किरीट सोमय्या याचे लंपट चाळे करणारी व्हीडीओ क्लिप व्हायरल झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. माहिती अधिकारच्या नावाखाली इतर पक्षातील लोकांना ब्लॅकमेल करून अय्याशी करणार्‍या किरीट सोमय्याचे काळे कारनामे उघड झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने त्याच्या प्रतिमेला जोडे हाणून आंदोलन करण्यात आले. यापुढे किरीट सोमय्या कुठेही दिसल्यास त्याला बदडून महाराष्ट्राबाहेर हाकलण्याचा निर्धार यावेळी शिवसैनिकांनी केला.

भाजपाचा कथित नेता किरीट सोमय्या याचे अश्लील चाळे करणारे व्हीडीओ प्रसारमाध्यमांसमोर आल्यानंतर महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. विशिष्ट पक्षातील लोकांना उघडे करण्याची भाषा करत स्वतःच नागड्या झालेल्या सोमय्याच्या प्रतिमेला मंगळवारी नळदुर्ग येथे शिवसेना (उबाठा) च्या वतीने जोडे हाणण्यात आले. यापुढे महाराष्ट्रात कुठेही सोमय्या दिसल्यास त्याला जोडे हाणून महाराष्ट्राबाहेर हाकलून देण्यात येईल असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला.

अरे हा महाराष्ट्र शिवछत्रपतींचा आहे, अन इथले संस्कार माँसाहेब जिजाऊंचे. निदान याची तरी लाज बाळगायला हवी होती. असला निचपणा इथे चालणार नाही. इतर पक्षातील लोकांना उघडे पडण्याची भाषा दररोज करता, त्याअगोदर स्वतःचे व्यक्तिमत्व किती पवित्र आहे याकडे लक्ष दिले असते तर कदाचित बरं झालं असते असे प्रतिपादन यावेळी तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी यांनी केले. माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण यांनीही अतिशय तीव्र शब्दांमध्ये यावेळी किरीट सोमय्यांवर निशाणा साधत टीका केली.

यावेळी तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, मा. उपजिल्हाप्रमुख कमलाकर काका चव्हाण, नळदुर्ग शहरप्रमुख संतोष पुदाले, उपतालूकाप्रमुख सरदारसिंह ठाकूर, कृष्णात मोरे, उपशहरप्रमुख शाम कनकधर, सोमनाथ म्हेत्रे, ग्राहक संरक्षण कक्ष चे नेताजी महाबोले, मयूर हुलगे, भीमा कोळी, चंद्रकांत सगरे, सुरेश कोळी आणि अन्य अनेक शिवसैनिक बांधव उपस्थित होते.

Related posts