उस्मानाबाद  कळंब

माळकरंजा येथील नूतन लोकप्रतिनिधींसह असंख्य ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

धाराशिव (उस्मानाबाद) – माळकरंजा ता.कळंब येथिल ग्रामपंचायतचे नूतन सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य यांच्यासह गावातील प्रमुख नेते यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला.

शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री मा.ना उद्धवजी ठाकरे साहेब व युवासेना प्रमुख तथा राजशिष्टाचार व पर्यावरण मंत्री मा.ना.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना संपर्कप्रमुख प्रा.आ.तानाजीराव सावंत, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री मा.ना.शंकरराव गडाख-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच धाराशिवचे लोकप्रिय खासदार मा. श्री. ओमराजे निंबाळकर आणि कळंब-धाराशिवचे लोकप्रिय आ. मा. कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली, माळकरंजा ता.कळंब येथिल ग्रामपंचायतचे नूतन सरपंच विलास महादेव मोहिते गावातील प्रमुख नेते बाळासाहेब जाधव, नानासाहेब पाटील, शरद गालट, धनंजय कराड, नितीन गोडसे, आनंत लोमटे, बळी मुंडे, बाळासाहेब लोमटे, प्रकाश गोडसे, सुधाकर मुळे, उमराव चव्हाण, अविनाश सारंग, मधुकर वाघमारे, रमेश तापिसे आदी सह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रवेश केला. यावेळी खा. ओमराजे निंबाळकर व आ. कैलासदादा पाटील यांच्या वतीने सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी धाराशिव लोकसभेचे लोकप्रिय खा. मा. ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, धाराशिवचे नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळकर, भारत काका देशमुख, रवी कोरे-आळणीकर, महादेव मगर यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related posts