Blog

26 नोव्हेंबर – भारतीय संविधान दिन.

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवास राव
सहशिक्षक – श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद
–-–——————————————

आज 26 नोव्हेंबर, भारतीय संविधान दिन. सर्वप्रथम भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा…! भारत हा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश मानला जातो. भारत हा विविध घटक राज्यांनी बनलेला देश आहे. विविध जाती, धर्म, संप्रदाय, श्रीमंत, गरीब, सर्वांचा देश आहे सर्वजण आनंदाने भारत माझा देश आहे व सारे भारतीय माझे बांधव आहेत अशी आनंदाने दररोज प्रतिज्ञा करतो. भारताचे संविधान हेच सांगते ते हेच शिकवते. सर्व धर्म समभाव सर्व जातींना धर्मांना संप्रदायांना समान न्याय समान हक्क समान कायदा असावा मिळावा व मिळालाच पाहिजे हाच आपल्या यासंबंधीं संविधानाचा उद्देश आहे. भारताचे संविधान हे भारताचा महान व ऐतिहासिक ग्रंथ म्हणून उल्लेख केला तर त्यात नवल नाही. संपूर्ण जगाला एक आदर्श नियमावली सर्व धर्म समभाव, मानव जातीसाठी मानवाच्या विकासासाठी घेतलेले योग्य निर्णय, लोकशाहीची खरी तत्वता, खरी शुद्धता पणाला लावून समाज विकास, देश विकास यासाठी केलेली अनोखी नेमावली. जी साऱ्या जगाला मान्य झाली ती म्हणजे आपल्या भारताचे संविधान होय.

मित्रांनो आज 26 नोव्हेंबर संविधान दिन आहे. ज्यांनी आपल्याला मानवतेचे संविधान दिले, त्या महान भारतरत्न महामानव संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या समितीतील सर्व तत्वज्ञाने विचार त्यांना सर्व महान विचारवंतांना कोटी कोटी विनम्र अभिवादन…! भारतीय संविधानाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे संविधान स्वतः हस्तलिखित लिहिलेले आहे. सर्वमान्य हे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने स्वीकार केले आहे. हे संविधान पूर्ण करण्यासाठी जवळजवळ दोन वर्ष अकरा महीने एवढा कालावधी लागलेला होता. या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच या समितीतील प्रमुख विचारवंत पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर अब्दुल कलाम, डॉक्टर राजेंद्र प्रसाद या सर्व विद्वानांनी आपल्या संविधानात तयार करण्यासाठी खूप खूप मेहनत घेतलेली आहे. संविधानाचे पितामह म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संबोधले जाते. या संविधानात सर्वधर्म समभाव आसाठी आरक्षणाची सुरुवात करणे, उच नीच हा भेदभाव दूर करणे, उच्च नीचता कमी करण्यासाठी भारतीय संविधानात अनेक अधिकार देण्यात आले आहेत. जसे शिक्षणाचा अधिकार, शेतीविषयक अधिकार, राजकीय क्षेत्रातील अधिकार, उद्योगक्षेत्रातील अधिकार, दळणवळण क्षेत्रातील अधिकार, नोकरीतील आरक्षण…

आज आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो तो आजचा दिवस या संविधानामुळेच आपल्याला प्राप्त झालेला आहे. जवळजवळ सव्वाशे करोड लोकांच्या आनंदाचा हक्काचा दिवस म्हणजेच संविधान दिन होय. जगातील सर्वात मोठे संविधान म्हणून भारतीय संविधान कडे पाहिले जाते. भारतीय संविधान म्हणजे भारताचा एक अमूल्य ठेवा आहे. कायदा स्वातंत्र्य अठरापगड जातीचे लोक आपल्या देशात राहतात त्यांची सुरक्षितता, त्यांची खरी लोकशाही आज संविधानामुळे टिकून आहे. संविधानातील घटना हाच सर्वात मोठा व महत्त्वाचा कायदा आहे. केवळ शासनासाठी नव्हे तर सर्वांसाठी जनसामान्यांसाठी देशातील तळागाळातील समाजासाठी, समान न्याय, समान हक्क, समान कायदा, लोकशाही शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला नवयुवक यांना भारतीय संविधानाची माहिती व्हावी ज्ञान व्हावे यासाठी सर्व भारतीयांना एका सूत्रात आणण्याचे मोलाचे कार्य संविधानाने केले. आहे प्रत्येकाला न्याय मिळालाच पाहिजे, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनले पाहिजे, म्हणून आज या संविधानाला खूप महत्त्व आहे. भारतीय संविधान म्हणजेच एक ऐतिहासिक मूल्यवान महान ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचा आजच्या नवीन पिढीने खूप खूप अभ्यास करावा. आजच्या या संविधान दिनी हीच अपेक्षा… संविधान म्हणजे देशासाठी देश हितासाठी केलेली खूप मोठी आहे ही चळवळ आहे. ज्यामुळे शेतकरी वर्ग मजूर वर्ग तळागळातील कामगार वर्ग या सर्वांना समान न्याय मिळणार आहे म्हणून प्रत्येकाने भारतीय संविधानाचा आदर व सन्मान केलाच पाहिजे व आपल्या संविधानानुसार आपली लोकशाही असली पाहिजे. सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे
सर्वांना संविधान दिनाच्या पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

Related posts