Blog

प्रेम करायला मनाई नाही पण……..

आज सगळीच तरुण मंडळी वयात आल्यावर त्यांच्या शरीरात काही आवश्यक बदल होताच त्यांना प्रेम करावसं वाटतं.ते प्रेमही करु लागतात.निःस्वार्थी स्वरुपाचं प्रेम.तसं ते वयच असतं प्रेम करण्याचं.मग ते तरी काय करणार.प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणत ही मंडळी प्रेमाचं चक्कर चालवतात.प्रेम आंधळं असल्यानं आपण त्या वयात काय करीत आहो,हे त्या वयात कोणाला समजत नाही.
तरुण वयात झालेलं प्रेम.त्या वयात धुंदी असल्यानं आणि शरीराच्या बदलानं झालेलं आकर्षण ते इतकं मोठं असतं की त्या वयात आपण काय करीत आहो हे त्या तरुणांना कळत नाही.मग त्या तरुणांना एकमेकांशिवाय जगणं मुश्किल होवुन जातं.घरची मंडळी रागावतात.आपल्या मुलींना कोणी फसवू नये हा परिवारांचा उद्देश.पण यातच कधीकधी आपली फसवणुक होते.
एक गोष्ट सांगतो.एक हिरकणी नावाची मुलगी होती.तिचं प्रेम होतं एका तरुणावर तो काही तिच्या जातीचा नव्हताच.मग त्या तरुणासोबत तिचं फिरणं उठणं बसणं सतत सुरु होतं.ते तिलाही फार आवडायचं.हातात हात घालून फिरतांना तिलाही मजा वाटायची.तिला वाटायचं की तो आपल्यालाच मिळावा.
तिची बहिण तिच्यापरस मोठी होती.ती घरच्यांचा काळजाचा तुकडा होती.तिनंही प्रेम केलं,निरतिशय प्रेम.त्यातच तिचा विवाह झाला.आज त्यांचा संसार व्यवस्थित सुरु होता.पण घरची मंडळी तिचा राग करायचं.आपल्याला एक अशीही मुलगी होती हे घरची मंडळी ओरडत होती.त्यांचंही बरोबर होतं.कारण त्यांनी अशा घटना भरपुर पाहिल्या होत्या.कित्येकांचे आंतरजातीय विवाह झाल्यावर एक दोन वर्ष चांगला संसार केल्यावर जेव्हा त्या युगलांना त्यांचा परीवार स्विकार करीत नाही आणि त्यांचा जेव्हा सैराट केला जातो किंवा जेव्हा संकट उभं राहातं तेव्हा मात्र अति विचार येतो की मी असं केलं नसतं तर बरं झालं असतं.मग खटके उडत असतात.त्याच्या पसंतीलाच दुजोरा द्यावा लागतो.तिला आपली इच्छा मारुन टाकावी लागते.तेव्हा मात्र ती हमखास आत्महत्या करुन मोकळी होते.कधीकधी याच खटक्यातुन त्याला दारुचे व्यसन लागते.ते व्यसन एवढं विकोपाला जातं की दोघंही आत्महत्या करतात.कधीकधी तर ते भांडण एवढं विकोपाला जातं की तो एक दिवस तिचा खुन करतो आणि तुरुंगात जातो अथवा स्वतःही आत्महत्या करतो.हे सर्वत्र सुरु आहे.
मित्र बनवितांना काहीच कळत नाही.हळूहळू त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होतं.मग हळूच ही मंडळी लग्नाचं आमीष दाखवतात.मग लग्नाचं आमीष दाखवुन वाट्टेल ते कृत्य लग्नापुर्वीच सुरु होतं.पण त्या कृत्यानं त्याचे परिणाम हे त्या तरुणीला जेव्हा भोगावे लागतात.तेव्हा ती त्या आमीष दाखविणा-या मित्राला म्हणते की त्याने लग्न करावे.पण तो तसे करीत नाही.थेट सांगतो की ती त्याची टाईमपास होती.त्याचा त्याने पैसा मोजलाय.अर्थात घुमविलं फिरवलं त्यासाठी पैसा मोजलाय.
हे तरुण वय केवळ टाईमपास करायला बरे आहे.पण त्याचे परिणाम वाईटच निघतात.यात काही शंकाच नाही.मित्र हे असे नसावे.प्रथम विवाह करावा.मग वाट्टेल त्या गोष्टी केल्या तरी चालेल.मुलींनीही या गोष्टी समजुन घ्याव्या.कारण सर्वात जास्त मुलीच अशा लग्नाच्या आमीषाच्या बळी पडत असतात.फिरायला नेल्यानंतर एका बंद कम-यात जेव्हा त्या मुलीला नेलं जातं.तेव्हा वासना निर्माण करुन हेच लग्नाचं आमीष देवुन लैंगीक कृत्य जेव्हा साधलं जातं.त्यात तिचीही संमती असतेच.कारण पुढे लग्नाचं आमीष असतं.तो हवाहवासा वाटतो.काहीकाही तर टाईमपास म्हणुन हे कृत्य आनंदानं स्विकार करतात.पण कोणाच्या मनातलं काही सांगता येतं का.ज्यावर अति विश्वास केला जातो.तो केव्हा काय करील हे सांगता तरी येतं का?ते सांगताच येत नाही.म्हणुनच आज सुंदर सुंदर मुली फसतात.
प्रेम करायला मनाई नाही.पण सावधान राहुन प्रेम करा.प्रेम करतांना खालील गोष्टी लक्षात घ्या.
१)तो मुलगा कमवता आहे का?हे आधी पाहा.कारण लग्नानंतर आपल्याला चारेल कसा.आपण पोट कसे भरु.याचा विचार करण्याची गरज आहे.कारण सर्वच मुलांना लग्नानंतर माय बाप चारत नाही.दुस-या जातीची म्हणुन पहिलं हाकलून लावतात.बेदखल करतात.
२)मुख्यतः आपलं करीअर बघा.लग्नानंतर तुमच्या इच्छा चालत नाही.त्या माणसाची मर्जी चालते.त्याचे दारु पिणे,अल्लड वागणे हे सर्व चालुन असते.
३)प्रेम करण्यापुर्वी तो कसा आहे चारीत्र्याने हेही लक्षात घ्या.कारण की चांगला चारीत्र्यवान मुलगाच तुम्हाला जीवनभर सांभाळू शकतो.
४)त्याची खानदान बघा कशी आहे.बदमाश आहे की अजुन कोणत्या गुन्हेगारीत आहे.हेही पाहा.कारण सैराट होवु शकतो.
५)तो तरुण तुमच्या समस्तर आहे का.हेही बघा.तुमच्याच स्तराचा समकक्ष असावा.तुमच्याएवढाच शिकलेला व तुमच्याएवढाच श्रीमंत.जास्तही नको आणि कमीही नको.
६)ते तुमच्या मायबापाची सेवा करु शकणारे आहेत का याचा विचार करावा.
जीवन असेच आहे.कधीकधी नात्यातल्या माणसांशी विवाह केल्यावरही फसवणुक होतेच.पण ही फसवणुक परवडणारी असते.सगळा परीवार धावुन येतो मदतीला.सक्षमपणे उभा राहतो.पण जातीतील तो तरुण नसला आणि फसवणुक झालीच तर मात्र ताशेरे ओढले जातात आपल्या कर्तृत्वावर……तुझ्यामुळच झालं आता आम्ही काय करणार.आता आम्हाला सांगू नको.तु जसं केलं तशी आपल्या कर्माची फळ भोग असं म्हटलं जातं.आम्ही तुझ्यासाठी काहीही करु शकत नाही.असं म्हणुन ती फाईल बंद केली जाते.ती ना पोलिसस्टेशनला जावु शकत ना कुठे?तिच्यापुढे पर्याय राहात नाही.ती वेडी होते सततचा मानसिक ताण सहन करुन.कधी मरतेय.म्हणुन प्रेम अवश्य करा.त्यासोबत लग्नही.पण सर्व गोष्टीचा विचार करुन ह्या सगळ्या गोष्टी करा.मायबापाचं ऐका.परीवाराचंही ऐका.त्यांच्या सहमतीनं सगळं करा.त्यातच तुमचं भलं आहे.नाहीतर तुम्ही जेव्हा फसाल.तेव्हा तुमचं कोणी ऐकणार नाहीत हे लक्षात घ्या.
अंकुश शिंगाडे
९३७३३५९४५०

Related posts