सोलापूर शहर

नितीन गडकरी यांना मिळु शकेल सोलापूर विद्यापीठाची मानद पी.एच.डी

गिरिकर्णिका फाऊंडेशनच्या प्रयत्नांना आले मोठे यश
अशोक सोनकंटले
विशेष प्रतिनिधी दक्षिण सोलापूर

भारताच्या दुर्गम खेडोपाड्या पर्यंत उत्कृष्ट राष्ट्रीय रस्त्याचे जाळे निर्माण करुन भारताच्या विकासात मोलाचे योगदान देणारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितिन गडकरी यांना दिनांक २६/०२/२०२१ रोजी गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाद्वारा मानद पी.एच.डी पदवी प्रदान करण्यात यावी अश्या मागणीचे विनंतीपर निवेदन इमेलद्वारे पाठवले होते.
गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांना पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठाच्या कुलसचिव कार्यालयाकडून दिनांक ०६/०४/२०२१ रोजीचे पत्र प्राप्त झाले. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमच्या कलमानुसार असे तरतुद असलेल्याचे पत्रात सांगण्यात आले आणि सदरचा प्रस्ताव हार्ड कॉपीमध्ये प्रस्तुत करण्याची विनंती केली आहे. लवकरच गिरिकर्णिका फाऊंडेशनच्या वतीने केंद्रीय दळणवळण मंत्री नितिन गडकरींना पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठाद्वारे मानद पी.एच.डी पदवी प्रदान करण्यासंबंधीचे हार्ड कॉपीचे निवेदनपर प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी सांगितले.

गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांना पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठातुन सर्वाधिक पदव्युत्तर पदवी प्राप्त करण्याचा मान प्राप्त झालेला आहे. गिरिकर्णिका फाऊंडेशनच्या वतीने सोलापूरच्या विकासाशी निगडित महत्त्वपूर्ण विषयांची अभ्यासपूर्ण आणि सुयोग्य पद्धतीने मांडणी करुन केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर सोडवणूक करण्यात यश प्राप्त झाले आहे. गिरिकर्णिका फाऊंडेशनच्या वतीने नितिन गडकरी यांना पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठाकडुन मानद पी.एच.डी पदवी प्रदान करण्या संबंधी केलेल्या मागणी विषयी सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षांव होत आहे.

Related posts