अक्कलकोट

हन्नुर येथे नेहरू युवा केंद्र च्या वतीने पाणी अडवा पाणी जिरवा कार्यक्रम संपन्न.

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – नेहरू युवा केंद्र व एस के ग्रुप हन्नूर यांच्या संयुक्त विद्यमाने युवा संसद व पाणी अडवा पाणी जिरवा कार्यक्रम संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन हन्नुरचे उपसरपंच सागर कल्याणशेट्टी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी महादेव कोळी , यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असुन त्यांचे नियोजन लोकसहभागातून झाले पाहिजे, यावेळी प्रमुख वक्ते आकाशवाणी वृत्तनिवेदक अरविंद जोशी व प्रा संतोष नरे सर यांचे पाणी अडवा पाणी जिरवा विषयावर चर्चा संवाद साधला. यावेळी नेहरू युवा केंद्र सोलापूर जिल्हा समन्वयक अजित कुमार , ग्रामविकास अधिकारी दयानंद बिराजदार, वैद्यकीय अधिकारी डॉ बिराजदार , तंटामुक्त अध्यक्ष सिद्राम पुजारी आदी उपस्थित होते .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच शरणाप्पा हेगडे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहरू युवा केंद्र अक्कलकोट समन्वयक व ग्रामपंचायत सदस्य प्रा गौतम बाळशंकर यांनी केले, यावेळी तुळसीराम ईरवाडकर , लक्ष्मण बाळशंकर, लक्ष्मण पुजारी, सागर बंदीछोडे, कोंडीबा सोनकांबळे, संतोष बाळशंकर, विनोद राठोड यासह गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सोपान निक्ते यांनी केले

Related posts