उस्मानाबाद 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तारेख मिर्झा यांची प्रदेश सरचिटणीस पदी निवड

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

कळंब : राष्ट्रवादीचे युवा नेते तारेख मिर्झा यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश युवक सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी निवडीचे पत्र दिले. गेल्या अनेक वर्षांपासून मिर्झा कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ राहिले आहेत. तारेख मिर्झा यांचे वडील स्वर्गीय सलिम मिर्झा हे राष्ट्रवादीचे अखेरपर्यंत नेते होते. सलग 35 वर्ष ते कळंब नगरपालिकेचे नगरसेवक होते.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदापासून त्यांनी सुरुवात केली. नंतर कळंब नपचे स्वीकृत नगरसेवक, उस्मानाबाद जिल्हा अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष या पदावर त्यांनी काम पाहिले आहे. तारेख मिर्झा हे उस्मानाबाद जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत.

तसेच सर्वच पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासोबत एकनिष्ठ असल्याची पोचपावती म्हणून तारेख मिर्झा यांना पक्षाने प्रदेश युवक सरचिटणीस पदाची धुरा दिली आहे.पदावर निवड होताच मिर्झा यांच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केला.

Related posts