कविता 

निसर्गाने आपले वेळापत्रक नाही बदलले- – — – – —

निसर्गाने आपले वेळापत्रक नाही बदलले- – — – – —

कोरोना महामारीमुळे,
सगळीकडे लोकडउन झाले

माणसाची तोंडे वेडीवाकडी झाली
माणूस पाहून माणसे
रस्ता बदलू लागली
माणसे माणसापासून दूर
चालली सगळं काही बदलले

पण निसर्गाने आपले वेळापत्रक नाही बदलले…,

आजाराचं प्रमाण वाढलं हजारो रुग्णांनी हॉस्पिटल भरलं लाखोंच्या संख्येने मृत्यूचे तांडव आकराळविक्राळ वाढले पण, निसर्गाने आपले वेळापत्रक नाही बदलले

पाऊस पडत राहिला नद्या वाहत राहिल्या विजांचा कडकडाट लपंडाव होत राहिला वादळे येत राहिले पण, निसर्गाने आपले वेळापत्रक नाही बदलले

पाऊस पडला विहिरी भरल्या तळे भरले बांध फुटले शेतकर्‍यांचे उभे पीक आडवे झाले शेतकऱ्यांची रास पाण्यात वाहताना पाहू लागले पण. निसर्गाने आपले
वेळापत्रक नाही बदलले

कोरोना ने भयंकर रुद्र रूप धारण केले लोक डाऊन सुरू झाले शाळा बाजार भाजीपाला बंद झाला पाहुणेरावळे लग्न समारंभ ठप्प झाले

पण निसर्गाने आपले वेळापत्रक नाही बदलले

कवि:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय,तुळजापूर. जिल्हा उस्मानाबाद.

Related posts