महाराष्ट्र

नारायण राणेंचा फोन लागला

मुंबई | मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातील ४ नेत्यांना स्थान मिळाले. यात भाजप नेते नारायण राणे यांच्या समावेश आहे. दरम्यान, नारायण राणे यांची केंद्रात वर्णी लागल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही दिवसांपासून नारायण राणेंना शुभेच्छा देण्यासाठी त्यांना फोन लावत होते. काल ( ११ जुलै) पुण्यात आले असता प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले. मात्र, आज ‘नॉट रिचेबल’ असणाऱ्या नारायण राणे यांचा फोन अखेर लागला आहे. राज ठाकरे यांनी फोनवरून नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या. सोमवारी सकाळी या दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरुन चर्चा झाली. मात्र, याशिवाय दोन्ही नेत्यांमध्ये कोणतीही राजकीय स्वरुपाची चर्चा झाली का, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पुण्यात पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन केले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी राज यांना तुम्ही नारायण राणे यांना शुभेच्छा दिल्यात का, असा प्रश्न विचारला होता. त्यावर राज ठाकरे यांनी माझा नारायण राणे यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नाही, केंद्र, राज्य सरकार सर्वांना मान्य आहे तर अडलंय कुठे?“राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीचं सरकार असताना मराठा आरक्षणासाठी एक मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह सर्व पक्षांचे नेते त्यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यावेळी मी सगळ्यांनाच मान्य आहे तर मग अडकलंय कुठे असं विचारलं होतं. फक्त मुद्दा उपस्थित करायचा आणि माथी भडकावायची एवढाच उद्योग आहे का? ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही केंद्र, राज्य सरकार सर्वांना मान्य आहे तर अडलंय कुठे?,” अशी विचारणा राज ठाकरेंनी केली आहे.समाधान कशावर व्यक्त करावं?सर्वांना मान्य आहे त कोणी अडवलं आहे? अशी विचारणा करताना राज ठाकरेंनी कोर्टात व्यवस्थित बाजू का मांडली जात नाही असंही विचारलं. तसंच सगळ्यांना व्यासपीठावर आणून चर्चा केली पाहिजे अशी मागणी केली. निवडणुकांच्या तयारीसाठी आलो

असल्याचं मान्य करताना राज ठाकरेंनी सगळ्याच निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत त्यामुळे काय होईल याची कल्पना नसल्याचं म्हटलं. तसंच लॉकडाउनच्या काळात सरकारचा कारभार पहायला मिळालेलाच नाही. त्यामुळे समाधान कशावर व्यक्त करावं? असा टोलादेखील लगावला. असे म्हटले होते. नारायण राणे यांना मी फोन केला होता. त्यांचे दोन्ही फोन आणि त्यांच्या मुलांचे फोन बंद होते. उद्या परवा नारायण राणे यांच्यासोबत बोलणं होईल, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर आज लगेचच राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात फोनवरुन चर्चा झाली आहे.
केंद्र, राज्य सरकार सर्वांना मान्य आहे तर अडलंय कुठे?“राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीचं सरकार असताना मराठा आरक्षणासाठी एक मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह सर्व पक्षांचे नेते त्यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यावेळी मी सगळ्यांनाच मान्य आहे तर मग अडकलंय कुठे असं विचारलं होतं. फक्त मुद्दा उपस्थित करायचा आणि माथी भडकावायची एवढाच उद्योग आहे का? ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही केंद्र, राज्य सरकार सर्वांना मान्य आहे तर अडलंय कुठे?,” अशी विचारणा राज ठाकरेंनी केली आहे.समाधान कशावर व्यक्त करावं?सर्वांना मान्य आहे त कोणी अडवलं आहे? अशी विचारणा करताना राज ठाकरेंनी कोर्टात व्यवस्थित बाजू का मांडली जात नाही असंही विचारलं. तसंच सगळ्यांना व्यासपीठावर आणून चर्चा केली पाहिजे अशी मागणी केली. निवडणुकांच्या तयारीसाठी आलो असल्याचं मान्य करताना राज ठाकरेंनी सगळ्याच निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत त्यामुळे काय होईल याची कल्पना नसल्याचं म्हटलं. तसंच लॉकडाउनच्या काळात सरकारचा कारभार पहायला मिळालेलाच नाही. त्यामुळे समाधान कशावर व्यक्त करावं? असा टोलादेखील लगावला.

Related posts