महाराष्ट्र सोलापूर शहर

खाजगी जागेत नग्न आंदोलन करणार – योगेश पवार

सोलापूर -: रेमडीसिवरचा कृत्रिम तुटवडा दूर करून ब्लॅकमध्ये काळाबाजार करणार्‍या संबंधित मेडिकल व खाजगी हॉस्पिटलवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेचे योगेश पवार यांनी, दि. 14/04/2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुनम गेटसमोर, सोलापूर येथे नग्न आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांकडे मागितली होती. परंतु, सदर नग्न आंदोलनास पोलिसांनी तत्परतेने परवानगी नाकारली.
तरीही येत्या दोन-तीन दिवसांत रेमडीसिवरचा काळाबाजार बंद करून पुरवठा सुरळीत केला नाही आणि साठेबाज मेडिकल व हॉस्पिटलवर कारवाई केली नाही. तर दि. 14 एप्रिलला खाजगी जागेत नग्न आंदोलन करणार असल्याचे योगेश पवार यानी सांगितले आहे.
तसेच खाजगी जागेत नग्न आंदोलन करण्यासाठी प्रशासकीय परवानगीची आवश्यकता नाही. त्यामुळे प्रशासनाने साठेबाज मेडिकल व हॉस्पिटलवर त्वरित कारवाई करून पुरवठा सुरळीत केला नाहीतर खाजगी जागेत नग्न आंदोलन करण्याचा इशारा योगेश पवार यांनी दिला आहे.

Related posts