Blog

रहस्य पांढुरण्यातिल गोटमारीचे

 स्नेहा मोहन बावनकर 

 लहान पोळ्याला दरवर्षी पांढुरण्यात गोटमारहोत असते पण यावर्षी ती कोरोणा संकटामुळे रद्द करण्यात आली. तरीही मी आज मला परिचयात असलेली कथा तुम्हाला सांगू इच्छिते…….       आता तुम्ही म्हणाल, ‘ हे गोटमार म्हणजे काय ?’  गोटमार म्हणजे लोक एकमेकांना दगड मारीत असतात पण लोक कुणालाच अकारण दगड मारीत नसतात. त्यामागे एक सत्य घडलेली घटना आहे…….       खूप वर्षाआधी एक मुलगी व मुलगा एकमेकावर प्रेम करीत होते. मुलगी ही सावरगावची तसेच मुलगा पांढुरण्याचा होता. त्यांचे एकमेकावर खूप प्रेम होते, त्यांना एकमेकाशी लग्न करायचे होते म्हणून त्यांनी आपल्या घर-परिवाराला सांगण्याचा निर्णय घेतला व घरी स्पष्टपणे सर्व सांगून टाकले. दोन्ही बाजूंनी पहिल्यांदा नकार आला पण त्यांचे एकमेकावर खूप प्रेम असल्याने त्यांनी आपल्या परिवाराला तसेच पूर्ण गावकरी मंडळीला खूप समजावले. मुलाने पांढुरण्यानील लोकांना समजावून आपली गोष्ट मान्य करवून घेतली व तेथील लोकही खूप उत्सुकतेने त्या मुलीला त्यांच्या गावाची सून बनवायला तयार झाले पण सावरगावच्या लोकांना ही गोष्ट मान्य नहोती म्हणून त्यांनी पांढुरण्यातील लोकांना नकार दिला व भांडण करून त्या मुलीला त्यांच्या गावी घेऊन गेले. .      त्या मुलाचे व मुलीचे एकमेकावर खूप प्रेम असल्याने त्या मुलीने गावातून पळून जाण्याचा निर्णय घेतला कारण तेथील लोक तिच्या प्रेमाला मान्य करीत नहोते. ती मुलगी आपल्या गावातून पळून गेली पण जाताजाता ती काही लोकांच्या निदर्शनात आली व तिच्या मागे लोकही तिला पकडण्याकरिता धावू लागले. मध्येच पांढुरण्यात जाण्याकरिता एक जाम नदी होती. त्या मुलीने ती नदी पार करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा ती मुलगी नदीला पार करीत होती, तेव्हाच दोन्ही गावातील लोक तिथे येऊन जमा झाले पण ती मुलगी नदितच फसून गेली. सावरगावचे लोक म्हणत, ‘ आम्ही आमच्या मुलीला तुमच्या गावाची सून होऊ देणार नाही .’ पण गावातील लोकांचा हट्ट होता की, ‘सून तर हीच मुलगी बनेल या गावाची.’ तिथेच दोन्ही गावातील लोकांनी भांडण  सुरू केले व एकमेकांना दगड मारायला सुरुवात केली..      एकमेकांना दगड मारून त्यांचे पोट भरले नाही कारण कुणीही आपल्या हट्टाला सोडून जाण्या तयार नहोते म्हणून सावरगावातील लोकांनी एक निर्णय घेतला की ते त्या मुलीलाच जिवंत ठेवणार नाही म्हणजे ती पांढुरण्यातील सून बनणार नाही म्हणून त्या लोकांनी मुलीलाच दगड मारून मारण्याचा प्रयत्न केला पण कसे-बसे का होई ना, पांढुरण्यातील लोकांनी त्या मुलीला जिवंत वाचविले व तेथील चंड्डीमातेच्या मंदिरात तिचे लग्न मुलाशी लावून दिले..      तेव्हापासून पांढुरण्यात दरवर्षी गोटमार होत असते. त्या मुलीच्या जागी एक झाड जाम नदीच्या मधोमध रोपित करण्यात येते. ही घटना लहान पोळ्याच्या दिवशी घडलेली असल्याने दरवर्षी लोक त्याचप्रकारे भांडण करीत असतात पण अंतिम क्षणी विजय ही प्रेमाची होत असते. मुलीच्या जागी दरवर्षी त्या झाडाची पूजा चंड्डीमातेच्या मंदिरात केली जाते..      सरकारने अनेकदा या परंपरेला रोखण्याचा प्रयत्न केला कारण या गोटमारमध्ये दरवर्षी अनेक लोकांचे जीव जात असतात पण आजही त्या परंपरेला कुणीच आढावा देऊ शकले नाही.
 – विचारधारा .

  ( स्नेहा मोहन बावनकर ).   कोरडी ( नागपूर ).   9960073686

Related posts