कविता 

माझ्या भारत देशा—–

माझ्या भारताचा हो
साऱ्या जगात मान
भव्य-दिव्य हिमालय
आहे देशाची शान

माझ्या भारताचा ध्वज
आहेत तीन रंगांचा तिरंगा
केशरी ,पांढरा, हिरवा
तीन रंगाचा भाव
आगळा-वेगळा

माझ्या भारताच्या मस्तकी
आहे हिमालयाचा टिळा
गंगा सिंधू सरस्वती नर्मदा
भरतो नद्यांचा कुंभमेळा
चरणस्पर्शन्या भारता

माझ्या भारताची शोभा
आहे गाव गाव एक
एक एक खेडे आहे
संस्कृतीची शान,मान

माझ्या भारत देशां
आम्ही तुझी लेकर
आनंदाने , पाहू गौरवू
तुझे रूप सौंदर्य!!

गाऊ तुझीच शौर्यगाथा
नतमस्तक भारत देशा
तुज़्याच आईएतिहासिक
विजयात!!🙏🏻🙏🏻

कवि:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव (सर)
श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय,तुळजापुर., जिल्हा उस्मानाबाद.

Related posts