कविता 

माझा शेतकरी बाप- – – – – –

माझा बाप शेतात
राब राब राबतो आहे
वर्षानुवर्षे चाललेली
परंपरा चालवतो आहे

दिवसा लाईट नसते
म्हणून रात्र रात्र जागतो आहे
ऊसाला पाणी देण्यासाठी
जीव तडफडतो आहे

घरावर कर्ज शेतावर कर्ज
पीक विम्याची वाट बघतो आहे
बँकेत खेटे मारून मारून
जीव थकतो आहे

कोरोना महामारी मुळे
सगळं काही संपलं
आभाळ फाटलं शेतातलं
पीक उभ्यानं वाहून गेलं

दिवाळीचा सन तोंडावर आला
तसा बापचा जीव
टागनीला लागला
कस आनू पोर जिवाला घोर

माझ्या बापा च जीवन
गेल गरीबी दारिद्र्य त
पण कळू दिल नाही
कधी लेकरबालाळस

फाटक्या कपड्यातला
माझा बाप ढसा ढसा
एकटच रडु न परिवार
,सांभाळायचा म्हणून

स्वतःलाच सावरत
देवाला हात जोडतो
नतमस्तक होतो आहे
हे पांडुरंगा शक्ती दे,
बळ दे पुन्हा उभारी
ये न्यासाठी🙏🏻🙏🏻जीवदान दे . . . ।

कवि:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय,तुळजापूर. जिल्हा उस्मानाबाद.

Related posts