अक्कलकोट

गोगांव ग्रामपंचायत सरपंचपदी सौ. वनिता मधुकर सुरवसे, उपसरपंचपदी कमलाकर सोनकांबळे यांचे बिनविरोध निवड.

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – गोगाव ता अक्कलकोट येथील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडीचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात श्री अध्यासी अधिकारी पी जी पाटील यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आला.यावेळी सरपंचपदी सौ. वनिता मधुकर सुरवसे आणि उपसरपंचपदी कमलाकर सोनकांबळे यांचे एक एक अर्ज आल्यामुळे बिनविरोध निवड करण्यात आली.

गोगांव ग्रामपंचायतीचे निवडणूक होळे पाटील, मुळजे व आलूरे गटाविरोधात श्री कलेश्वर ग्रामविकास पॅनलनेचे सर्वंच्या सर्व सात उमेदवार प्रचंड मताने निवडून आले आहेत, यावेळी पाटील मुळजे आलूरे गटाच्या उमेदवाराना खुप मोठ्या मताने पराभव स्वीकारावे लागले, गेल्या २०-२५ वर्षांपासून गोगांव गावच्या विकासासाठी श्री प्रदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली गावच्या विकासासाठी काम अविरतपणे चालू आहे यावेळी देखील प्रदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली पॅनल प्रमुख मधुकर सुरवसे अशोक मुलगे यांच्या मार्गदर्शनाखाली सातच्या सात उमेदवार विजयी झाले आहेत.

नूतन सरपंचपदी निवड झाल्यानंतर बोलताना सरपंच सौ.वनिता सुरवसे म्हणाल्या की , माझ्यावर खूप मोठी जबाबदारी गावकऱ्यांनी सोपवली असून गावच्या विकासासाठी मी अखंड प्रयत्न करणार आहे गोगांव गाव डिजिटल व अक्कलकोट तालुक्यात एक वेगळं विकसात्मक गाव बनविण्यासाठी आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी व प्रदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे असे मत व्यक्त केले.

यावेळी अध्यसी पाटील, सरपंच सौ. वनिता मधुकर सुरवसे, उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, सदस्य प्रदीप जगताप, लक्ष्मण बिराजदार, सौ. महादेवी होळे, सौ. ललिता कलशेट्टी, सौ. कलावती गायकवाड यांच्या उपस्थितीत पहिली सभा संपन्न झाले यावेळी ग्रामसेवक बिरप्पा वडरे, यांनी अध्यसी अधिकारी यांना सहकार्य केले सरपंच व उपसरपंच यांना पुढील कार्यास आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी फोन वरून शुभेच्छा दिले

Related posts