उस्मानाबाद  तुळजापूर

शहापूर येथे खा. ओमराजेंचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा.

तुळजापूर – प्रति वर्षाप्रमाणे धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेमध्ये पर्यंतच्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. त्याचबरोबर जवळ जवळ 20 ते 25 वर्ष शहापूर गावात अनेक आजी माजी विद्यार्थी घडविणारे

गुरुवर्य श्री एकनाथ शिरगुरे सर यांचा मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. लहान गटात सोलापूर जिल्ह्यातून प्रथम येणाऱ्या शहापूर गावातील शिवाजी तांदळे यांच्या मुलाचा सत्कार गौरव करण्यात आला. यावेळी मित्रपरिवार उपस्थित होता.

Related posts