Blog

आधुनिक विद्यार्थ्यांमधील शिक्षणाची स्पर्धा – देविदास पांचाळ (सर)

आधुनिक विद्यार्थ्यांमधील शिक्षणाची स्पर्धा – देविदास पांचाळ (सर)

आधुनिक युग हे स्पर्धेचे युग म्हणून पुढे आले आहे काळ बदलला माणसं बदलली विचार बदलले विविध विचारांचे समूह समोर आले विविध क्षेत्रात झपाट्याने प्रगती झाली माहिती तंत्रज्ञानाचे जाळे जगभर पसरले आणि याच बदलत्या वादळामध्ये आजचा विद्यार्थीजाळयात सापडलेला आहे खरंतर प्रत्येक विद्यार्थी हा सारखा नसतो सारख्या बुद्धिमत्तेचा नसतो आधुनिक कलचाचणी मध्ये हेच सिद्ध झालेलेच आहे शिक्षणातील विविध क्षेत्रात त्यांचा कल दिसून येतो शिक्षणाने फक्त डॉक्टर इंजिनिअर्स वकील शिक्षक प्राध्यापक मोठ्या पदावरील नोकरी यासाठीच असते असे नाही खरं तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हा मुख्य उद्देश शिक्षणाचा आहे.

आज विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची अफाट स्पर्धा दिसून येते शाळेत विद्यालयात महाविद्यालयात शिकत असताना सुद्धा बाहेर खाजगी क्लासेस चे भयंकर स्वरूप वाढलेले दिसते विद्यार्थ्यांना कुठल्या क्लासला जावे प्रवेश घ्यावा हा मोठा प्रश्न पडतो जो तो आपल्या आकर्षक जाहिरातीने प्रलोभन आने आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो अशाप्रकारे शाळा महाविद्यालय शिक्षणाची स्पर्धा चाललेली आहे परंतु याचा सर्व परिणाम विद्यार्थ्यांच्या बालमनावर होताना दिसतो आहे विद्यार्थ्यांमध्ये काळजी निराशा उदास उदास नैराश्याचे विचार अशी जीवघेणी स्पर्धा चालू आहे शिक्षणाचे बाजारीकरण झालेले दिसून येते म्हणावे तसे गुण टक्के मिळाले नाही तर विद्यार्थी निराश होऊन आत्महत्येकडे वळतो परंतु हा यातील मार्ग नव्हे अफाट संख्या वाढल्यामुळे कितीही टक्केवारी घेतली तरी आवडीप्रमाणे क्षेत्र कॉलेज शहर मिळायला तयार नाही म्हणून विद्यार्थी व पालक निराशेच्या गर्तेत अडकलेला आहे.

विद्यार्थ्यांनी फक्त नोकरीसाठी म्हणून नव्हे तर चांगले जीवन जगण्यासाठी म्हणून शिक्षणाचा उपयोग करावा जरी असे झाले तरी विद्यार्थ्याने स्वावलंबी धाडसी बनवून अभ्यासाला लागले पाहिजे मेहनत केली पाहिजे म्हणतात ना मेहनत का फल मीठा होता है आज प्रत्येक क्षेत्रात भयंकर स्पर्धा दिसून येते प्रत्येकाला चांगले शहर व नामांकित कॉलेज आपल्या ला मिळालेच पाहिजे म्हणावा तो कोर्स आपल्याला मिळालाच पाहिजे असा आता अट्टाहास दिसून येतो म्हणावे ते शहर कॉलेज नाही मिळाले तर नाईलाजाने कुठेतरी ऍडमिशन घेऊन मोकळे होतात पालक नाराज होतात व विद्यार्थी दिशाहीन होतात या जीवघेण्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी विद्यार्थ्या सोबतच पालकांनी जागरूक होणे गरजेचे आहे बाजारात आलेली नवनवीन पुस्तके मासिके वृत्तपत्रे मोबाईल तसेच इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थी अभ्यासात रुची घेत आहेत दररोज नवनवीन ज्ञान समोर येत आहे तर रोजचा सूर्य नवीन टेक्निक घेऊन उगवत आहेत म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला आधुनिक काळानुसार अपडेट रहावेच लागेल आणि राहिलेच पाहिजे.

आज विषयातील गुणवत्ता शंभर टक्के असणारे हजारो विद्यार्थी पुढे येत आहेत त्यामध्ये दोन-तीन प्रकारचे वर्ग तयार झालेले दिसतात वर्गात प्रॉपर असणारे विद्यार्थी वर्गात मध्यम असणारे विद्यार्थी वर्गातील साधारण विद्यार्थी शिक्षकांनासुद्धा अध्यापन करताना या तिन्ही वर्गाचा विचार करूनच अध्यापन करावे लागते निसर्गाचा सरळ सरळ नियम आहे जो जास्त मेहनत घेईल परिश्रम करेल कष्ट करेल यश त्याच्याच पदरात पडणार आहे जो आळस त्या गुण मेहनत करेल तोच प्रगती करेल शिक्षणातील स्पर्धा वाढवून त्याचा मूल्य शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे त्यांच्या मूल्य शिक्षणातील अभाव दिसून येतो आहे विद्यार्थी नैतिक मूल्य पासून हळूहळू दूर जात आहे आदराची भावना विनम्रता अशा सद्गुना पासून अलिप्त होता हे तंत्रज्ञानामुळे तो आळशी झोपाळू बनत चालला आहे म्हणतात ना लागलेली भूक नसलेले पैसे तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते जे कुठलीच डिग्री शिकवत नाही ठरवलेल्या ध्येयाकडे वाटचाल करीत असताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो अडथळे येतात कारण चांगल्या रस्त्याला गतिरोधक हे असतातच म्हणून आपण निराश न होता सकारात्मक विचाराची ऊर्जा घेऊन वाटचाल केली तर मन स्थिर राहून आनंद मिळतो व वेगवेगळ्या स्पर्धेचा अभ्यास आपण करू शकतो स्पर्धेने भरलेल्या या नौकेतून विद्यार्थी प्रवास करीत आहे अशा या स्पर्धेच्या भयंकर वादळाच्या तडाख्यात ऊन विद्यार्थी पुढे जात आहे या भयंकर वादळात विद्यार्थी जगावा तरी कसं हा प्रश्न सर्वांच्या पुढे उभा आहे म्हणावे वाटते विविध स्पर्धेने नटलेल्या देशात विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांची होत असलेली दुर्दशा असो क्रीडा व कला विज्ञान जीव तोड पळ ता भुई थोडी शिक्षक म्हणती टक्केवारी पालक म्हणते मिरीट रेंज लोक म्हणती मेडिकलला लावा पण कोणी घेना मुलाच्या मनाचा ठाव.

अशा स्पर्धेच्या युगात फक्त स्पर्धक म्हणून नव्हे तर माणूस म्हणून जगता आले पाहिजे कुठलाही वेवसाय करा काम करा कामाला लाजू नका कारण श्रमाचे मोल . . . . अनमोल।

लेखक
देविदास पांचाळ
श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय,तुळजापूर।

Related posts