करमाळा

आमदार आपल्या दारी शासकीय योजना पोहचतील घरोघरी उपक्रम जातेगाव येथे संपन्न.

प्रतिनिधी.
विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम आमदार संजयमामा शिंदे हे करमाळा विधानसभा मतदारसंघात राबवत आहेत.यानिमित्ताने खडकी ,जातेगाव, आळजापुर ,कामोणे,पूनवर, वडगाव उत्तर व दक्षिण, बिटरगाव ,पोथरे,मांगी येथील जनतेकरीता जातेगाव येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन नायब तहसीलदार सुभाष बदे यांच्या हस्ते 25 फेब्रुवारी रोजी करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी पंचायत समिती सदस्य दत्ताभाऊ जाधव,मांगीचे ग्रामपंचायत सदस्य सुजिततात्या बागल,राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष आशपाक जमादार,जातेगाव ग्रामपंचायत उपसरपंच अच्युत कामठे,आळजापुरचे माजी सरपंच युवराज गपाट,राष्ट्रवादी युवती काॅग्रेसच्या तालुकाध्यक्षा शितलताई क्षिरसागर,युवती कार्यध्यक्षा स्नेहलताई अवचर,युवती ता.उपाध्यक्षा संस्कृतीताई बागल,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ता.उपाध्यक्ष तुषार शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ता.उपाध्यक्ष सुरज ढेरे व तसेच सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी वर्ग,विविध क्षेत्रातील मान्यवर,गावातील जेष्ठ नागरीक,ग्रामस्थ उपस्थित होते.
या उपक्रमामध्ये नागरिकांना नवीन रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना आणि नवीन मतदार नोंदणी, उज्वला गॅस योजना, एस.टी. बस पास, मोतीबिंदू तपासणी व उपचार, आधार कार्ड नोंदणी, ई श्रम नोंदणी, दिव्यांग नोंदणी, असंघटित कामगारांची नोंदणी अशा विविध शासकीय योजनांच्या पात्रतेचे निकष सांगण्यात आले. तसेच पात्र गरजु नागरिकांचे अर्ज कार्यक्रम स्थळी स्वीकारण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजित तात्या बागल यांनी केले आभार पांडुरंग पवार यांनी मानले. तर सूत्रसंचालन डॉ. विकास वीर यांनी केले.

Related posts