उस्मानाबाद  तुळजापूर

ऑक्सिजन प्लॅन्ट ला भेट देऊन आ. कैलास पाटील यांनी घेतला ऑक्सिजन उत्पादन प्रक्रियेचा आढावा.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

तुळजापूर – तुळजापूर तालुक्यातील गोरज गॅस, तामलवाडी येथील ऑक्सिजनच्या प्लॅन्टला भेट देऊन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळंब-धाराशिव चे विद्यमान आमदार, आ. कैलासदादा पाटील यांनी ऑक्सिजन उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला.

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि उपचारादरम्यान आवश्यक असलेल्या ऑक्सिजची कमतरता भरून काढण्यासाठी उत्पादन प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना व्यवस्थापन यंत्रणेस देत उस्मानाबाद(धाराशिव) जिल्ह्यातील रुग्णालयांना ऑक्सिजन टाक्यांची कमतरता पडू न देण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले उचलण्याचे निर्देश यावेळी आ. कैलासदादा पाटील यांनी दिले.

प्रशासकीय यंत्रणेसह आम्ही सर्वजण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहोत. नागरिकांनी देखील मास्क वापरणे, सॅनिटाइझर आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करावे व आपला जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती यावेळी आ. कैलासदादा पाटील यांनी नागरिकांना केली.

यावेळी आ. कैलासदादा पाटील यांच्यासह स्थानिक शिवसेना पदाधिकारी, प्लॅन्ट चे मालक व कर्मचारी उपस्थित होते.

Related posts