उस्मानाबाद  तुळजापूर

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

तुळजापूर – शिवसेना जिल्हाप्रमुख तथा धाराशिव-कळंबचे विद्यमान आमदार मा. श्री. कैलादादास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना मित्र परिवार तुळजापूर तालुका आयोजित करण्यात आलेल्या आमदार क्रिकेट चषकाचे पारितोषिक वितरण समारंभ धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात धाराशिवचे खासदार मा. श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला.

या पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे औचित्य साधून तुळजापूर आ. कैलासदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा तुळजापूर शिवसेनेचे तालुकाप्रमुख मा. जगन्नाथ गवळी व शहरप्रमुख सुधीर कदम यांच्या हस्ते तुळजापूर शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.


आ. कैलासदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा तुळजापूर शिवसेनेचे तालुकाप्रमुख मा. जगन्नाथ गवळी व शहरप्रमुख सुधीर कदम यांच्या हस्ते तुळजापूर शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या स्पर्धेत, प्रथम – पारितोषिक 11 – स्टार हंगरगा तुळ, द्वितीय – छञपती क्रिकेट क्लब चिंचोली, तृतीय – राजहंस क्रिकेट क्लब उळे, चतुर्थ – बी.पी.एल क्रिकेट क्लब बेंबळी अशी प्रमुख पारितोषिके खा. ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. तसेच या पारितोषिकांसह वैयक्तिक पारितोषिकसुद्धा यावेळी वितरित करण्यात आली.

आ. कैलास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खिलाडू वृत्तीच्या प्रोत्साहनपर या स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल खा. ओमराजे निंबाळकर यांनी तुळजापूर शिवसेनेसह उपतालुकाप्रमुख रोहित चव्हाण यांचे विशेष कौतुक करत आभार व्यक्त केले. तसेच यापुढेही आपण आ. कैलासदादा पाटील आणि खा. ओमराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली असेच सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे यावेळी तुळजापूर शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख रोहित चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी धाराशिव (उस्मानाबाद) चे खा. ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा धाराशिव कळंबचे आमदार कैलासदादा पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजयबापू सस्ते, पंचायत समिती सदस्य शाम जाधव, तुळजापूर तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, तुळजापूर शहर प्रमुख सुधीर कदम, युवासेना जिल्हाचिटणीस लखन कदम-परमेश्वर, शिवसेना उप तालुकाप्रमुख रोहित नागनाथराव चव्हाण, शिवसेना सोशल मिडीया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, युवासेना शहरप्रमुख सागर इंगळे, माजी युवासेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, अर्जुन(आप्पा) साळुंखे, सोशल मिडीया विभागप्रमुख सिद्रामप्पा कारभारी, येवती सरपंच अमोल गवळी, शंकर गव्हाणे, बालाजी पांचाळ, चेतन चव्हाण, हंगरगा उपसरपंच अमोल नन्नवरे, आण्णाप्पा पवार, श्रावण पवार, पाराजी देवकर, माजी उपसरपंच दशरथ चौगुले, अमिर शेख, लक्ष्मण माळी, फारूक शेख, किशोर चव्हाण, फुलचंद माने, सौरभ चव्हाण, वैभव चव्हाण, श्रीराम कुंभार यांच्यासह अनेक शिवसैनिक बांधव उपस्थित होते.

Related posts