Blog

निसर्गाचा चमत्कार नवल नवलाई – – – – –

लेखक
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद

निसर्गामध्ये आपल्याला खूप चमत्कार खूप आश्चर्य खूप नवल नवलाई बघायला मिळते हिवाळा असेल किंवा पावसाळा ऋतु असेल या ऋतूमध्ये निसर्गामध्ये आपल्याला वेगवेगळे बदल झालेले दिसून येतात त्यामध्ये पक्षांचे बदल प्राण्यांचे बदल वनस्पतींचे बद्दल वेगवेगळ्या वृक्षांचे झालेले बदल दिसून येतात काही फुलांनी काही कळ्यांनी काही पानांनी काही फळांनी भरून गेलेली झाडी आपल्याला दिसतात जीवनातील जिद्द जीवनातील ध्येय गाठण्यासाठी जणूकाही निसर्गाची सुद्धा चढाओढ लागलेली असते निसर्गातील दोन टेकड्यांच्या मध्ये आलेला हा सुंदर वृक्ष पहा ना खाली जमीन आणि वर आकाश उमेद आहे ती जगण्याची जिद्द आहे धडपड आहे ते जग पाहण्याचे व जगाला आपली हिंमत नवल नवलाई दाखविण्याची किती सुंदर वृक्ष हिरव्यागार पानांनी नटलेला आपल्याला दिसत आहे परंतु एका उंच अशा खडकावर पर्वतावर आलेला आपल्याला दिसेल ज्या ठिकाणी पाणी सुद्धा राहत नाही याला म्हणायचं जगण्याची जबरदस्त जिद्द निसर्ग शक्ती निसर्गाचा चमत्कार…

अगदी याच प्रमाणे मानवी जीवनात सुद्धा भरपूर संकटे येतात समस्या येतात परंतु त्याचा सामना करत संकटांना तोंड देत आपण आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे जिद्दीने तळमळीने करीत राहण्याची ही एक प्रेरणाच देत आहे जसा दगडाला देवपण घेण्यासाठी खूप कष्ट हाल सोसावे लागतात अगदी त्याच पद्धतीने ने आपल्या जीवनात सुद्धा कष्ट मेहनत कार्याप्रती प्रेम व कामाची तळमळ असली पाहिजे तरच त्या क्षेत्रात मोठी अशी प्रगती दिसून येते आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत त्याच क्षेत्रात आनंदाने उत्साहाने व सकारात्मक विचाराने कार्य केले पाहिजे तर ते कार्य यशस्वी होऊन त्याचा समाजाला खूप मोठा फायदा होतो एक चांगला विचार पेरला तर हजारो चांगले विचार आपल्याला मिळतात या पहाडी वर आलेल्या सुंदर वृक्षाकडे पाहिल्यानंतर खरोखरच आपल्या जीवनाचा अर्थ आपल्याला कळतो

Related posts