उस्मानाबाद  कळंब

कळंब भाजप बुथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक.

जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
कळंब:-
मराठवाडा पदवीधर मतदार संघातील भाजपाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांना मोठ्या मतांनी निवडून आणण्यासाठी मेहनत घ्यावी असे आवाहन केले.

यावेळी केले. या मतदारसंघाचे गेल्या १२ वर्षांपासून प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवाराने पदवीधरांसाठी नेमकं काय केलंय, आपल्या जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी कोणता न्याय मिळवून दिलाय हे खरे तर त्यांना विचारायची गरज आहे.

राज्य सरकारचा गेल्या वर्षभराचा कारभार पाहता तो अत्यंत निराशाजनक आहे. राज्य सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. या उलट मोदीजींनी केंद्र सरकारच्या माध्यमातून जनहिताची अनेक कामे केली असून याच कामांच्या जोरावर बिहार सह देशभरातील निवडणुकात भाजपने विजय मिळवला आहे. कोरोना काळात उस्मानाबाद जिल्ह्यात देखील भाजपने जेवढे काम केले आहे तसे दुसऱ्या कोणीही केलेले नाही.

राज्यात सत्ता परिवर्तनाची प्रक्रिया सुरु झाली असून याच निवडणुकीच्या निकालाने सत्ता परिवर्तनाचा रस्ता खऱ्या अर्थाने खुला होणार आहे. पदवीधर मतदारांशी व्यक्तिशः संपर्क साधून प्रत्येक मत भाजपाचे उमेदवार श्री.शिरीष बोराळकर यांच्याकडे कसे वळवता येईल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. प्रत्येक कार्यकर्त्यांना या निवडणुकीत जबाबदारी वाटून दिलेली आहे. पक्षाने टाकलेली हि जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी. पक्ष संघटनेच्या बळावर
हि जागा चांगल्या मतांनी येणे गरजेचे आहे. या निवडणुकीतील विजयासाठी कळंब शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी खारीचा वाटा उचलावा असे आवाहन उस्मानाबाद तुळजापूर चे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले.

त्याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नेताजी पाटील, तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, संजय पाटील, उत्तमराव टेकाळे, दत्तात्रय साळुंके,अशोकभाऊ शिंदे,रामहरी शिंदे, उमेश कुलकर्णी, श्री.बालाजी अडसूळ, मिनाज शेख,अरुण चौधरी, प्रणव चव्हाण, मकरंद पाटील, संदीप बाविकार, माणिक बोंदर, प्रशांत लोमटे,किरण पाटील, सतीश मडके, अमोल मडके, फेरोज पठाण, बाळासाहेब पवार आदींची उपस्थिती होती.

Related posts