उस्मानाबाद  तुळजापूर

मधुशाली महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा.

किलज – तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि) येथील मधुशाली महाविद्यालयात दि.२७ रोजी असणाऱ्या कविवर्य. वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला.

यावेळी सामाजिक अंतराचे पालन करून हा दिन साजरा करण्यात आला. यावेळी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे मुबिन पटेल यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्व पटवून सांगितले, मराठी ही भाषा आपण जशी लिहितो तशीच ती टिकवणे ही महत्वाचे आहे.अश्या प्रकारे विविध मार्गने मार्गदर्शन पर माहिती दिली. यामध्ये प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी मधुशाली महाविद्यालयाचे प्राचार्य. एन. स्वामी ,महाविद्यालयाचे प्रा. संतोष केसकर, सचिन गिरी, मुबिन पटेल,खंडेराव सुरवसे, स्वप्नील भरगंडे, श्रद्धा पारवे,शैला भोसले ,लक्ष्मी मेंशेट्टी व कर्मचारी मेहबूब पठाण अस आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि समारोप महाविद्यालयाचे सचिन गिरी यांनी केले.

Related posts