दक्षिण सोलापूर

मंद्रुप पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन थेटे बनत आहेत सर्वसामान्य व्यक्तीसाठी मसिहा.

गुंडगिरी करणाऱ्यांना आपल्या संयमी शब्दानेच शांत करण्यात यशस्वी

अशोक सोनकंटले
विशेष प्रतिनिधी दक्षिण सोलापूर

दक्षिण सोलापूर येथील मंद्रुप पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन थेटे यांनी अवघ्या काही काळातच आपल्या कार्याची छाप सोडले आहेत.
सर्वसामान्य व्यक्तींना कोणाकडूनही अन्याय होवू नये याकडे नितीन थेटे यांचा कल असतो. पुर्वीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप धांडे साहेब यांच्या बदली नंतर मंद्रुपसाठी नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नितीन थेटे यांनी कारभार हाती घेतला.

ही वेळ म्हणजे कोरोना सारखी महामारी भयंकर मोठ्या प्रमाणात वाढत चालली होती. नितीन थेटे यांनी अवघ्या काही दिवसातच मंद्रुप पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील परिस्थितीचा आढावा घेत कोरोना महामारी मध्ये आपल्या सहकारी पोलीसांना योग्य रित्या मार्गदर्शन करत कोरोना सारख्या संकटाला बऱ्यापैकी रोखण्यासाठी प्रयत्न केले व त्यामध्ये ते यशस्वी झाले. नितीन थेटे व पिंगुवाले यांच्या नेतृत्वाखाली मंद्रुप पोलीसांनी बाहेरच्या राज्यातील कोरोना काळात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप पोहचवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.

याच काळात तीन ते चार चोरीचे प्रकरण घडले. यावेळी मंद्रुप पोलीसांनी योग्य रित्या शोध घेत त्या चोरांना पकडले. नितीन थेटे हे दिसायला संयमी विचाराचे आहेत पण त्यांची कामाची पद्धत वेगळी आहे. या लॉकडॉऊन काळात सर्वसामान्य व्यक्ती कोरोना सारख्या महामारीच्या आहारी जावू नये म्हणून मंद्रुप पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सर्व गावात कडक नियमाचे पालन करुन फक्त अत्यावश्यक गोष्टीसाठीच सुट देण्यात आल्यामुळेच कोरोना ग्रामीण भागात कमी प्रमाणात शिरकाव केला याचे श्रेय डॉक्टर, नर्स, आशा वर्कर्स, यांच्याबरोबर पोलीस प्रशासनाचा तेवढाच वाटा आहे याचे श्रेय मंद्रुप सहाय्यक पोलीस निरिक्षक नितीन थेटे व त्यांच्या टीमला जाईल.

नितीन थेटे हे तक्रार घेवून येणाऱ्या दोन्ही बाजूंना वेळ देवून दोन्ही बाजू समजून हे प्रकरण कसे आपसात मिटेल याची तळमळ थेटे यांची आहे. कारण या दोन वर्षापासून चाललेल्या महामारीमुळे सर्वसामान्य व्यक्ती जे शेतीविषयक व अन्य बाबी घेवून येतात व त्यांची आर्थिक बाजू अशक्त झाल्याने त्यांना कोर्ट कचेरीकडे न जाता शांततेत ही तक्रार निवारण कसे होईल याकडेही जास्तीत जास्त कल दिसतो…यामुळेच सर्वसामान्य व्यक्ती नितीन थेटे यांच्याकडे आपल्याला न्याय भेटेल म्हणूनच त्यांच्याकडे धाव घेताना दिसत आहेत.

Related posts