दक्षिण सोलापूर

मंद्रुप ग्रामपंचायत सफाई कामगारांचा आजपासून संप,

गेल्या दोन महिन्यापासून वेतन न दिल्याने निर्णय – सफाई कर्मचारी.

जोपर्यंत पगार होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही – ग्रा.सफाई कर्मचारी

अशोक सोनकंटले
दक्षिण सोलापूर विशेष प्रतिनिधी

मंद्रुप ग्रामपंचायतमध्ये कर्मचारींना गेल्या दिड महिन्या अगोदरच ग्रामपंचायतच्यावतीने त्यांची दिवाळी गोड करण्यात येईल असे सांगण्यात आले होते.
व सात आठवड्यासाठी आठवडा बाजार निलावची रोख रक्कम कर्मचाऱ्यांची पगार देणार असल्याचे सांगितले पण आज दिड महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असतानाही कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्काचे वतन मिळाले नाही. यामुळे त्यांची दिवाळी दिव्यावींना आणि लाडू फराळावींना झाल्याचे दिसून आले.तशातच मंद्रुपचे ग्रामसेवक नागेश जोडमोटे यांनी रजेवर गेल्याने त्यांची जागी एस.आर.ठक्का यांना नियुक्ती करण्यात आले. ठक्का यांना सहीचे अधिकार मिळायलाच एक महिन्याचा कालावधी गेला.

ग्रामपंचायतचे बँकेत पैसे असूनही कर्मचाऱ्यांची पगार न झाल्याने कर्मचाऱ्यातून नाराजीचे सूर पाहायला मिळत आहे. उपसरपंच अल्लाउद्दीन शेख यांनी आपण कर्मचाऱ्यांना दिवाळी अगोदर पैसे देण्यात येईल असे सांगितले होते.पण दिवाळीही गेली.अजूनही कर्मचाऱ्यांच्या पगारी झाल्या नाहीत.
मंद्रुप ग्रामपंचायत येथे सरपंच, उपसरपंच ग्रामविकास अधिकारी ठक्का यांचा ताळमेळ नसल्याने गावाला स्वच्छता ठेवणारे जे स्वताच्या आरोग्याची परवा न करता गाव स्वच्छतेची मोहीम राबवतात. त्यांचेच पगार वेळेवर होत नसेल तर हे दुर्दैव आहे.

मंद्रुप ग्रामपंचायत प्रशासनाने कर्मचाऱ्यांना जोपर्यंत त्यांचे दोन महिन्याचे वेतन देत नाहीत. तो पर्यंत संप मागे घेणार नाही असा पवित्रा घेतला आहे. यामुळे आता गटविकास अधिकारीच मंद्रुप ग्रामपंचायतमध्ये होत असलेल्या कारभारावर लक्ष केंद्रित करुन नेमकं मंद्रुपच्या ग्रामपंचायतमध्ये ग्राम विकास अधिकारी म्हणून कोण येणार? का ठक्का यांनाच कायम करणार याचा निर्णय घ्यावा. त्यामुळे मंद्रुप करांना दाखले व विविध कामाची अडचण निर्माण होवू नये यासाठी योग्य निर्णय घेण्यात यावा.

Related posts