पंढरपूर

पिकांचे, घरांचे सूक्ष्म पंचनामे करा……पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

पंढरपूर -गेल्या दोन दिवसांत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तसेच पडझड झालेल्या घरांचे सूक्ष्म पंचनामे करावेत.  कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी व बाधित कुटुंब वंचित राहणार नाही याची दक्षता संबधितांनी घ्यावी अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.
श्री. भरणे यांनी आज पंढरपूर येथील कुंभारघाट येथे भेट देवून पाहणी  केली तसेच  चंद्रभागा नदीच्या तीरावरील कुंभार घाटावरील संरक्षित भिंत कोसळल्यामुळे सहा जण मरण पावल्या कुंटुबियांची भेट घेतली. यावेळी त्याच्या समवेत जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्विनी सातपुते, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर उपस्थित होते.
श्री. भरणे म्हणाले, पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या तीरावरील कुंभार घाटावरील संरक्षित भिंत कोसळल्यामुळे सहा जण मरण पावले. त्यांच्या कुटुबियांना शासनामार्फत आवश्यक ती मदत करण्यात येईल. निकृष्ट दर्जाचे  घाट बांधणी करण्याऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यांमध्ये कोणीही दोषी आढल्यास संबधितांवर योती कारवाई करण्यात येणार आहे.
 
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टिने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घरांची  पडझडही मोठ्या प्रमाणात   झाली आहे. बंधाऱ्यांचे व पाझर तलावांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . जिल्हा प्रशासनाला नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे पंचनामे करुन अहवाल शासनास सादर  करण्यासाठी सांगितले आहे.  शासन शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, शासनस्तरावरुन नियमानुसार आवश्यकती मदत करण्यात येणार असल्याचे श्री. भरणे यांनी सांगितले.                       
यावेळी प्रांताधिकारी ढोले यांनी तालुक्यात  अतिवृष्टीने नुकसान झालेल्या  विविध भागांची माहिती दिली तसेच प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती दिली.  

अभंगराव कुटूंबियांची  पालकमंत्री यांनी घेतली भेट
  
पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या तीरावरील कुंभार घाटावरील संरक्षित भिंत कोसळल्यामुळे सहा जण मरण पावले.  या मध्ये  मरण पावलेल्या अभंगराव कुटूंबियांच्या नातेवाईची भेट पालकमंत्री भरणे यांनी घेतली व शासनाच्या वतीने मृत्यू व्यक्तीच्या नातेवाईकाला चार लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे सांगितले.

Related posts