सोलापूर शहर

” होळी करा लहान, पोळी करा दान !”

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानतर्फे वंचित बेघर लोकांना सुमारे पाचशे पुरणपोळ्यांचे वाटप

सोलापूर : पर्यावरण जागृती, सामाजिक बांधिलकीतून श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने होळी करा लहान, पोळी करा दान.. हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी चाटी गल्ली येथील कोणार्क रेसिडेन्स व नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत, सुमारे पाचशे पुरण पोळ्याचे दान प्रतिष्ठानच्या पदरात टाकले आहे.

होळी लहान करून पर्यावरण वाचवावे व पुरण पोळी होळीत अर्पण न करता दान करून गरीबांच्या मुखात घालावे या आवाहनाला सोलापूरातील विविध गृहनिर्माण सोसायट्या, सार्वजनिक होळी मंडळांनी प्रतिसाद दिला.सोलापूर मध्ये श्रीमंतयोगी युवक व महिला आघाडीच्या वतीने शहरात विविध ठिकाणी रहिवाशांकडून पुरणाच्या पोळ्या गोळा करण्यासाठी गेले होते.यावेळी सुमारे पाचशे पोळ्या गोळा करण्यात आल्या.

प्रमुख पाहुणे म्हणून आरपीएफचे जवान सुनील कांबळे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट यांच्या हस्ते पोळी वाटप करण्यात आले.

या सर्व पोळ्यांचे वाटप सोलापूरात रेल्वे स्टेशन, शनि मंदिर, मोदी खाना, सात रस्ता, कंबर तलाव, जुळे सोलापूर, सैफुल, आसरा चौक, गूरूनानक चौक, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय परिसर, सिध्देश्वर मंदिर, दयानंद काँलेज पशी झोपडपट्टी अशा ठिकाणी गोरगरीब अनाथ , वंचित बेघर अशा लोकांना वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे अत्यंत उत्साहाने स्वागत करीत समाजात पर्यावरणविषयी तसेच सामाजिक बांधिलकीविषयी जागृती करणारे उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षता कासट, रूपा कुत्ताते, प्रियंका जाधव, सायली गायकवाड, भाग्यश्री वंजारे, श्रुष्टी भागवत, प्रमोद भुतडा, गणेश येळमेली, शुभम कासट, निशांत वाघमारे, रवी नावदगीकर, सुरेश लकडे, संतोष अंलकुटे, नितीन कुलकर्णी, शंकर बंडगर, अक्षय हुनगुद, मेहुल भुरे, पंकज उंजळबे, नितीन धब्बे, संगांबसू शिवंगी आदींनी परिश्रम घेतले.

पर्यावरण जागृती, सामाजिक बांधिलकी जोपासली : कासट
समाज व देशहित डोळ्यासमोर ठेवून आपले सण, परंपरांमध्ये योग्य बदल घडविणे हे आपल्या समाजाचे एक अभिमानास्पद वैशिष्ट्य असल्याचे सांगत पर्यावरण जागृती, सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने होळी करा लहान, पोळी करा दान.. हा उपक्रम राबविण्यात आला.अशी भावना संस्थापक महेश कासट यांनी व्यक्त केली.

Related posts