कळंब

महाआवास योजनेची पंचायत समिती मध्ये बैठक संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

कळंब – महा आवास अभियान अंतर्गत केंद्र व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनेचा अति.मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,जिल्हा परिषद उस्मानाबादचे अनिलकुमार नवाळे यांच्या अध्यक्षतेखाली दि २ जानेवारी रोजी महा आवास अभियानाची बैठक संपन्न झाली.

या अभियानाच्या माध्यमातून १०० दिवसाच्या कालावधी मध्ये घरकुले यशस्वी रित्या पुर्ण करण्यासाठी कळंब पंचायत समिती अंतर्गत अपुर्ण घरकुल व चालू घरकुलाचा आढावा घेण्यात आला असून या महा आवास अभियानामध्ये अपुर्ण घरकुल व चालू घरकुले पुर्ण करण्याबाबत सुचना दिल्या .

यावेळी या बैठकीला कळंब पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजगुरू, जिल्हा ग्रामीण प्रोग्रामर मेघराज पवार, उप अभियंता बांधकाम कोरडे, सर्व क्षेञीय अधिकारी, ग्रामीण ग्रह निर्माण अभियंता, संगणक परिचालक, विस्तार अधिकारी ,कनिष्ठ सहायक आकुलवाड आणि ग्रामसेवक उपस्थित होते.

Related posts