उस्मानाबाद 

महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. डी. आर. माने यांनी विद्यापीठ उपपरिसर उस्मानाबाद ला भेट

साईनाथ जगन्नाथ गवळी
तुळजापूर/उस्मानाबाद(धाराशिव)
प्रतिनिधी,


महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. डी. आर. माने सर यांनी विद्यापीठ उपपरीसर उस्मानाबाद येथे सदिच्छा भेट दिली. विद्यापीठ उपपरिसर मधील कोविड_19 लॅब ची पहाणी करून तेथे काम करत असलेल्या कर्मचाऱ्या सोबत चर्चा केली. या वर्षी उपपरीसरात 5500 वृक्षारोपण केलेल्या झाडांची पाहणी केली व उप परिसराच्या विकासा बाबत ज्येष्ठ व्यवस्थापन परिषद सदस्य मा. संजय निंबाळकर यांच्या सोबत चर्चा केली.


कोविड-19 टेस्टिंग लॅब च्या पाहणी दरम्यान त्यांनी तेथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा करत त्यांच्या सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले.

भेटीदरम्यान विद्यापीठ उपपरिसर च्या वतीने व्यवस्थापन परिषद सदस्य मा. संजय निंबाळकर यांनी डॉ. डी.आर. माने यांचा सत्कार केला. कोविड-19 टेस्टिंग लॅब च्या पाहणी दरम्यान त्यांनी तेथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा करत त्यांच्या सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले. सध्या सुरू असलेल्या अत्यावश्यक अशा लॅबसाठी असलेले सर्वांचे परिश्रम लक्षात घेता त्यांनी सर्वांचे कौतुक केले.


भेटीदरम्यान विद्यापीठ उपपरिसर च्या वतीने व्यवस्थापन परिषद सदस्य मा. संजय निंबाळकर यांनी डॉ. डी.आर. माने यांचा सत्कार केला.

यावेळी सर्व परिसर फिरून पाहणी केली. विज्ञान इमारत, मुलींची वस्तीग्रह, व उपपरिसर चा इतर परिसराची पाहणी केली. डॉ. माने सर यांनी पाहणी दरम्यान परिसरातील अंतर्गत रस्ते होणे गरजेचे आहे व अजून उप परिसराचा विकास होणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. श्री संजय निंबाळकर यांनी विकासात्मक पाठपुरावा चालू आहे अशी त्यांना माहिती दिली.


यावेळी सर्व परिसर फिरून पाहणी केली. विज्ञान इमारत, मुलींची वस्तीग्रह, व उपपरिसर चा इतर परिसराची पाहणी केली.

यावेळेस व्यवस्थापन परिषद सदस्य मा. संजय निंबाळकर, प्रा. डॉ. शित्रे सर, प्रा चंद्रजीत जाधव सर ,प्रा. डॉ.दीक्षित सर, श्री धनराज सोमवंशी, श्री तुकाराम हाराळकर व इतर उपस्थित होते.

Related posts