23.4 C
Solapur
September 10, 2024
उस्मानाबाद  कळंब

कळंब येथे नगर परिषद समोर महाराष्ट्र क्रांती सेनेचे आंदोलन सुरू

जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

कळंब येथील नगर परिषदे समोर श्री.नारायण कोंडीबा शिरसागर रा.पुनर्वसन सावरगाव तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद यांनी बेकायदेशीर अतिक्रमण करून भिंत बांधून रस्ता बंद केले बाबत महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन गेल्या ३दिवसापासुन सुरू आहे. श्री नारायण कोंडीबा शिरसागर यांनी अतिक्रमण केले असून ते तात्काळ पाडण्यात यावे

अशी मागणी महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वतीने करण्यात येत आहे. सदर जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करून भिंत बांधली आहे, त्यामुळे शेजारी दलित वस्ती जवळचा रस्ता बंद केलेले आहे. सदर अनधिकृत बांधकाम प्रकरणी महाराष्ट्र क्रांती संघटनेच्या वतीने सन २०१७ पासून तक्रार, निवेदन, अर्ज,तसेच वेळोवेळी आंदोलने केली आहेत.

परंतु सदर नगर परिषद कार्यालय कळंब हे कुठल्याही प्रकारची कार्यवाही करत नसल्याने संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन,तिर्डी आंदोलन व बोंबाबोंब आंदोलन करण्यात येत असुन ३दिवसा पासुन बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.सदरील आंदोलन संघटनेचे महाराष्ट्र राज्य संघटक वसंत देडे, महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंत डोंगरे, उस्मानाबाद महिला जिल्हा अध्यक्ष राजुबाई जाधव,पुणे जिल्हा उपाध्यक्ष बळीराम देवकुळे,कळंब तालुका अध्यक्ष समाधान डोंगरे, यांच्या नेतृत्वाखाली सुरू असुन अद्याप ही या विषयावर तोडगा निघला नसल्याचे संघटनेचे राज्य संघटक वसंत देडे यांनी सांगितले. या बेमुदत धरणे आंदोलनात संघटनेचे कार्यकर्ते सहभागी आहेत.

Related posts