तुळजापूर

मौजे काक्रंबा येथे महाराजस्व अभियान संपन्न.

साईनाथ जगन्नाथ गवळी
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा
प्रतिनिधी.

तुळजापूर तालुक्यातील मौजे काक्रंबा गावात महाराजस्व अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या तक्रार नोंदणी कार्यक्रमात गावातील ग्रामस्थांच्या दृष्टिकोनातून,गावात दारूबंदी करण्यात यावे,तसेच शासकीय नियमानुसार ३%शासकीय अपंगनिधी खर्च करण्यात यावा,व रत्नागिरी नागपूर हायवेवरील काक्रंबा येथे उड्डाणपूल व रस्ता लवकरपूर्ण करण्याबाबत लेखी तक्रार दिले.

यावेळी उपस्थित शिवसेने चे काक्रंबा गणप्रमुख कालिदास सुरवसे, शिवसेना सोशल मिडीया तालुकाप्रमुख चेतन बंडगर,वासुदेव भालेराव,अहमद अन्सारी,करीम अन्सारी,नंदकुमार ढेरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts