तुळजापूर

मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब बुधवारी तुळजापूर दौऱ्यावर.

पूरग्रस्त/नुकसानग्रस्त भागांची करणार पाहणी.

साईनाथ गवळी,
तुळजापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी,
गेल्या काही दिवसापुर्वी झालेल्या परतीच्या पावसाने उस्मानाबाद जिल्ह्यात व तुळजापुर तालुक्यात मोठे थैमान घातले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील हाता तोडांशी आलेल्या सोयाबीन खरीपाचा घास अतिवृष्टीने हिरावला आहे. तर पीकही गेले आणि शेतातील मातीही वाहुन गेली. त्यामुळे नुकसान होवून शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये पिकासह अनेक घरांची पडझड झाली असून काही कुटूंबियांच्या घरातील संसारोपयोगी साहित्यांचेही नुकसान झाले आहे.

निसर्गाच्या भयंकर चक्रामुळे शेतक-याकडून नुकसानीपोटी मदतीची अपेक्षा होत असल्यामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरीता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे बुधवार दि. 21 ऑक्टोबर उस्मानाबाद जिल्ह्यात येत आहे. बुधवार दि. 21 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील तुळजापुर तालुक्यातील काटगाव व आपसिंगा या दोन गावाना मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे हे भेट देवून नुकसानीची पाहणी करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचा दौरा कार्यक्रम असा :
सोलापूर शासकीय विश्रामगृहाहून काटगावकडे प्रयाण.
स.१०.२० वा. काटगाव येथे आगमन, अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी. काटगाव काटगाव येथून तुळजापूर मार्गे अपसिंगा (ता. तुळजापूरकडे) प्रयाण. स. ११.३० वा. अपसिंगा येथे आगमन व अतिवृष्टीमुळे घरांची पडझड व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी. अपसिंगा येथून तुळजापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी १ वा. पूर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागताच्या भेटी राखीव. दु. १.३०ते १.४५ वाजेपर्यंत पत्रकारांशी संवाद
दु. १. ४५ वा. शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथून सोलापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व ३.३० वा. सोलापूर येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.

Related posts