उस्मानाबाद 

म.रा.वि.वि.कं. अभियंता संतोष चव्हाण यांचासारख्या उत्क्रुष्ट व विकासाची द्रुष्टी असणा-या अभियंताची जिल्ह्यास आवश्यकता – मा.पं.स. सदस्य रामभाऊ पडवळ.

साईनाथ जगन्नाथ गवळी
तुळजापूर / उस्मानाबाद (धाराशिव)
प्रतिनिधी.

दि.16/11/2020 रोजी उपळा मा.येथील मराविविकं सबस्टेशनचे अभियंता श्री.संतोष चव्हाण यांनी मागील 6 वर्षाचा कालावधीत उपळा व परीसरातील शेतक-यासाठी अतिषय उत्तम सेवा दिली.त्यानी शेतक-यासाठी सुरळीत वीज पुरवठा होण्यासाठी अनेक डी.पी. उभारणी केली,नवीन कनेक्शन्स लवकर मिळावे म्हणून सतत प्रयत्नशील असत.त्यानी शेतक-याना सेवा देण्याबरोबर उपळा हद्दीतील वितरण कंपनीच्या इतर सुविधामध्ये कायमस्वरुपी विकास होण्यासाठी मोठे पर्यन्त केले तसेच संतोष चव्हाण सारख्या अभियंताची जिल्ह्यास आवश्यकता असल्याचे उदगार मा.पंस सदस्य रामभाऊ पडवळ यांनी काढले.

अशा उत्क्रुष्ठ काम केलेल्या अभियंतास निरोप देण्यासाठी समस्त शेतक-यानी मिळून सोहळा घेतला. श्री.संतोष चव्हाण यांचा सत्कार प.स.सदस्य रामभाऊ पडवळ, सरपंच बप्पा पडवळ, अच्युतआप्पा पडवळ, श्री.प्रकाश पडवळ, प्रविण घोगरे, राहुल घोगरे, शहाजी शितोळे, सुधाकर पडवळसर, प्रविण पडवळसर, सुभाष शेटे, विक्रम काकडे, किसनमामा जगदाळे आदी शेतक-याचा हस्ते करण्यात आला.

निरोपसभारंभाचे नियोजन व सुत्रसंचालन महेश पडवळ यांनी केले तर कार्यक्रमास गंगाराम झरकर, व्यंकटेश पडवळ, तुळशीदास पडवळ, भगवान जगदाळे, पप्पुमामा नवले, रामभाऊ शेटे, दादा नवले, राम गौरकर, विक्रम शेटे, सौदागर खामकर, दत्ता रणखांब, श्रीशल्य घोंगडे, बापु घोंगडे इ. समस्त उपळा गावातील शेतक-यानी आर्वजुन उपस्थित होते.

Related posts