महाराष्ट्र

राज्यातला लॉकडाउन ३१मेपर्यंत वाढला

कॅबिनेटच्या आजच्या बैठकीत राज्यातला लॉकडाउन ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्त स्थगिती देण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला आहे.
आज झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय हा महत्त्वाचा आहे. त्याचसोबत राज्यातलं १८ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरणही स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related posts