पंढरपूर

“फिरसे स्कूल चले हम”- एम.आई.टी. पंढरपूर येथे ऑफलाईन क्लासेस आणि नवीन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

सचिन झाडे
पंढरपूर –

मार्च २०२0 पासून भारतामध्ये सुरु झालेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार यांनी घेतलेल्या निर्णयानुसार देशामधील सर्व शैक्षणिक संस्था सुमारे आठ महिन्याहुन अधिक कालावधी साठी कोरोना विरोधी सुरक्षक उपाय म्हणून बंद करण्यात आलेल्या होत्या. भारतामध्ये या रोगाचा प्रसाराचा वेग जसाजसा कमी होत गेला त्याप्रमाणे शालेय शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र सरकार यांच्या आदेशा प्रमाणे अनलॉक अंतर्गत पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावी व दुसऱ्या टप्प्यात इयत्ता पाचवी ते आठवी चे वर्ग सुरु करण्या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या असून लवकरच विद्यार्थ्यांना प्रदीर्घ कालावधी नंतर शाळेची घंटा पुन्हा एकदा लवकरच ऐकायला मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रातील अनेक शाळा तयारीला लागल्या असून विद्यार्थी व पालक यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. एम.आई.टी. विश्वशांती गुरुकुल स्कूल, वाखरी पंढरपूर हि संस्था देखील आपल्या विद्यार्थ्यांच्या स्वागताला तसेच एप्रिल २०२१ पासून सुरु होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ प्रवेश प्रक्रियेसाठी सज्ज झालेली आहे.

मागील वर्षी मार्च २०२० पासून भारतामध्ये कोरोना या रोगाच्या साथीचा वाढता प्रभाव लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने आवश्यक उपाययोजना तसेच कोरोना बाधित रुग्णांसाठी उपचार देण्या हुतुपर अनेक सरकारी, निम सरकारी , तसेच खाजगी संस्थांचा इमारती तत्परत्या स्वरूपात ताब्यात घेतल्या होत्या पंढरपूर शहरामध्ये कोरोना चा फैलाव काही प्रमाणात उशिरा सुरु झाला असला तरी देखील मे २०२० पासून शहर व परिसरामध्ये अनेक रुग्ण आढळून आले. पंढरपूर शहरात कोरोना बाधित रुग्णांसाठी असणाऱ्या अपुऱ्या सोयी लक्ष्यात घेता या संस्थेनी रुग्णाच्या सेवे साठी आपल्या सुसज्ज इमारती देऊन पंढरपूर मधील जनतेला खूप मोठा दिलासा दिला. या ठिकाणी आत्तापर्यंत सुमारे ४००० पेक्षा अधिक लोकांनी उपचार घेऊन कोरोना मुक्त झाली आहेत. संस्थेनी कोरोना महामारीच्या काळात सामाजिक बांधिलकी लक्ष्यात घेऊन पंढरपूर व परिसरामध्ये राहणाऱ्या जनतेसाठी केलेल्या कार्याचे कौतुक पंचक्रोशीमध्ये होत असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. विश्वनाथजी कराड यांच्या मार्गदर्शनाखाली एम.आई.टी. हि संस्था शैक्षणिक, सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहे.

मागील आठ महिन्यापूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशात वाढत असताना सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला ज्यामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्था कोलमडून पडली अशामध्येच अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी कायम राहावी तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या साठी प्रयत्न केले गेले पण या पद्धती मध्ये असणाऱ्या मर्यादा लक्ष्यात घेता अनेक शैक्षणिक संस्थांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले. अशा खडतर परिस्थिती मध्ये देखील एम.आई.टी. गुरुकुल स्कूल या संस्थेनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सहज व सुखकर करून दिले व १००% अभ्यासक्रम पूर्ण केला ज्यामुळे हि संस्था पालकांच्या विश्वासाला पुन्हा एकदा पात्र ठरली ज्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

शासनांनी शाळा सुरु करण्या संदर्भात पाऊल उचलत कोरोना महामारीच्या काळात कोविड केअर सेंटर साठी घेतलेल्या सर्व इमारतीचे वारंवार निर्जंतुकीकरण करून संस्थांना परत देण्यात आलेल्या आहेत तसेच या बाबत शाळा प्रशासन देखील अधिक जागरूक असल्याचे दिसून आलेले आहे व त्याप्रमाणे शाळा सुरु होईपर्यंत दररोज परिसरामध्ये स्वच्छता व निर्जंतुकीकरण मोहीम राबवण्यात येत आहे यासाठी सफाई कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा शाळेच्या आवारात तैनात करण्यात आलेला आहे.

एम.आई.टी. विश्वशांती गुरुकुल निवासी स्कूल आपल्या दर्जेदार शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुखसुविधा साठी संपूर्ण महाराष्ट्र तसेच इतर प्रांतात ख्यातनाम असून या संस्थे मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी विशेष उपाययोजना संस्थे मार्फत करण्यात आलेल्या असून सर्वच पालक लवकरच शाळा सुरु होण्याचा प्रतीक्षेत असून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठीं उत्सुक दिसून येत आहेत.

Related posts