कविता 

करू या होळी कोरोणाची—-

———————////———-
करू या होळी आपल्या
मनातील कुविचारांची
दुष्ट भावनेची, दुराचाराच्या
राक्षसाची!
आजही होतात अन्याय,
अत्याचार निष्पाप महिलावर
बालिकाही सुरक्षित नाहीत
कलियुगात!

कलियुगातील या वासनान्ध
राक्षसाची आज करू या
होळी अग्निताण्डवात
बिचार्या शेतकऱ्यांच्या
गृहलक्ष्मीने केलेली कष्टाची
गौरी” नका करू तिची राख
रांगोळी!वृक्षची आपुले जीवनसाथी नका करू होळी वृक्षवल्लीची!
करू या होळी भयंकर
राक्षसरूपी कोरोणा विषाणुची
मास्क,सैनिटाइजर वापरून,
गर्दी टाळून,हात धूवून
करू या होळी कोरोणाची!

==============================================================================

कवि:-
देविदास पांचाळ सर
श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद।

Related posts