शेतशिवार

जाणून घ्या: हवामानातील बदल

हवामान बदल (Climate Change) म्हणजे वातावरणातील दीर्घकालीन बदलांमुळे वाढणारे तापमान आणि त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या समस्या यामुळे नैसर्गिक घटकांचा समतोल राहत नाही त्यामुळे, अवकळी पाऊस, हिम नग वितळणे, तापमानात सरासरी वाढ होणे, इत्यादी घटना घडतात.
विवध प्रकारे सतत उत्सर्जित होणारा कार्बन डाय ऑक्साईड आणि मिथेन वायु सारख्या या हरितगृह वायूंचे वाढते उत्सर्जन हे पृथ्वीच्या वातावरणात उष्णता अडकवतो आणि यामुळे पृथ्वीच्या तापमानवाढीस हातभार लागतो, ज्यामुळे समुद्राची वाढती पातळी वाढत आहे, यामुळे वारंवार आणि गंभीर हवामान बदल घटना आणि वातावरणातील बदल यांचा परिणाम होत आहे.

सतत होणऱ्या ज्वालामुखीचा उद्रेक आणि सौर किरणोत्सर्गातील बदल यासारख्या नैसर्गिक घटना तसेच जीवाश्म इंधन जाळणे, जंगलतोड आणि वातावरणात हरितगृह वायू सोडणाऱ्या औद्योगिक प्रक्रियांसारख्या उद्योग या विविध कारणांमुळे हवामान बदल होत आहे.
हवामानातील बदल हा सध्या जागतिक तथापि, त्याचे गंभीर परिणाम पिकांच्या वाढीवर व उत्पादनावर दिसून येताहेत. अचानक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यास अवकाळी पाऊस, गारपीट, कडाक्याची थंडी, उष्णतेची लाट, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ या सर्वांचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होतो. यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी हवामान बदल ही संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. पिकांचे नियोजन हे जमीन पाणी व हवामान या तीन प्रमुख घटकांवर अवलंबून आहे. पीक वाढीचा व हवामानाचा निकटचा संबंध आहे. सध्या वातावरणातील बदलांचा विचार केला, तर पीक नियोजन हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
वातावरणातील बदलाचा पिकांवर काय परिणाम होतो तसेच त्याला कसे सामोरे जाता येईल, ते पाहूया…!

तापमानवाढीचा पिकावर होणारा परिणाम:

शेतीसंबंधी असणारे सर्व जोडधंदे (उदा. दुग्धोत्पादन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन इत्यादी बहुतांशी तापमानावरच अवलंबून असतात. तापमान प्रत्येकी १ अंश सेल्सियस वाढले तर मका, ज्वारी, गहू व धान उत्पादनात अंदाजे १० टक्के इतकी घट होते. तापमान वाढल्यामुळे हवेतील सापेक्ष आर्द्रता कमी होते. जमिनीचे तापमान वाढल्यामुळे सेंद्रिय कर्ब कमी होतो व उपयुक्त जिवाणूंची घट होते.

पावसाचा पीक उत्पादनावर होणारा परिणाम:

अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. बऱ्याचदा सतत पडणान्या जोराच्या पावसामुळे ओला दुष्काळसदृश परिस्थिती तयार होते. अतिपावसामुळे पिकाच्या काढणी, आंतरमशागती व लावणीवर परिणाम होतो. पिकांची पडझड होऊन आतोनात नुकसान होते.

थंडी, उष्णतेची लाट, वादळ यांचा पिकावरील परिणाम:

वातावरणात अचानक बदल होऊन कडाक्याची थंडी किंवा लाट आली तर केळी, द्राक्षे, फळबागा, भाजीपाला या पिकांवर परिणाम दिसून येतो. याचप्रमाणे उष्णतेची लाट आल्यासही काही पिके तग धरू शकत नाहीत. ती करपून वाळून जातात तसेच जर धावते वादळ झाल्यास उसासारखी पिके लोळतात, काढायला आलेली भातासारखी पिके झडतात. केळीसारख्या पिकाची पाने फाटतात. उन्हाळी पिकांवर व फळबागांवर धूळ साचल्याने त्यावर रोग आणि किडीची वाढ होऊ शकते.

आर्द्रतेचा पीक उत्पादनावरील परिणाम:

आर्द्रतायुक्त हवामान काही पिकांना पोषक तर काही पिकांना हानिकारक असते. द्राक्ष पिकाला आर्द्रतायुक्त हवामान घातक ठरते, तर पानमळ्यास पोषक ठरते. भाजीपाला पिकास थंड हवामान मानवते, तर ज्वारी, बाजरी, धान पिकांना उष्ण कोरडे हवामान मानवते, आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यास बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढते.

ढगाळ हवामानाचा पिकावर होणारा परिणाम:

ढगाळ हवामानामुळे उभ्या पिकांवर वेगवेगळ्या किडी व रोगांचा हमखास प्रादुर्भाव होता. किडी-रोगाचे नियंत्रण करण्यासाठी खर्च तर वाढतोच शिवाय उत्पादनात घट होते. ढगाळ हवामानामुळे पिकांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे पिकाची कर्बग्रहण क्रिया ठप्प होते व उत्पादनात घट होते.

बदलत्या हवामानानुसार करावयाच्या उपाययोजना:

1. हवामानावर आधारित कृषी सल्ल्याचा वापर वाढवणेव त्यानुसार पीक व्यवस्थापनात बदल करणे महत्त्वाचे आहे.
2. हवामान बदलानुसार पिकांचे तंत्रज्ञान विकसित करणे.
3. कृषी हवामान विभागानुसार पीक पद्धतीत बदल करणे..
4. विविध कृषी हवामान विभागानुसार पीकप्रारूप तयार करावीत व त्याप्रमाणे पिके घ्यावीत.
5. हवामान बदलास योग्य अशा एकात्मिक शेती पद्धतीचे वेगवेगळे प्रारूप तयार करावे.
6. बदलत्या हवामानानुसार पीक तंत्रज्ञान वापरून खते व पाणी इत्यादींनी कार्यक्षमता वाढवावी.
7. जैविक व अजैविक ताण सहन करणाऱ्या वाणांचा वापर करावा.
8. सिंचनाचा वापर वाढवावा. पाणलोट क्षेत्रामध्ये मृदा व जलसंधारण पद्धतीचा विकास करून हवामान बदलाची तीव्रता कमी करता येते.
9. बदलत्या हवामानाला तोंड देशासाठी शेतीमध्ये वाक्य तेवढा कृषी यांत्रिकरणाचा वापर करावा.

हवामान बदलाचे पर्यावरणावर होणारे आपत्ती जनक परिणाम काय परिणाम होतात, ते पाहूया… हवामान बदलाचे पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि समाजावर व्यापक परिणाम होतात.

हवामान बदलाच्या काही महत्त्वपूर्ण परिणामांमध्ये खालील घटक समाविष्ट आहे:

1. जागतिक तापमान वाढत आहे, ज्यामुळे वारंवार आणि तीव्र उष्णतेच्या लाटा, दुष्काळ आणि वनात आग लागते.
2. जसजसे तापमान वाढत आहे, हिमनद्या आणि बर्फाचे आवरण वितळत आहेत, ज्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे.
3. हवामानातील बदल पर्जन्यमान बदलत आहेत, परिणामी वारंवार आणि गंभीर पूर आणि दुष्काळ यासारख्या घटना घडत आहे.
4. वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे महासागर अधिक आम्लयुक्त होत आहेत, आणि ह्यामुळे सागरी जीवन आणि परिसंस्थांना हानी पोहोचत आहे.
5. हवामान बदलामुळे अनेक वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होत आहेत, ज्याचे दूरगामी पर्यावरणीय आणि आर्थिक परिणाम होऊ शकतात.
6. वातावरणातील बदलामुळे उष्णतेशी संबंधित आजार, श्वसनाच्या समस्या आणि संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचे प्रमाण वाढत आहे.
7. हवामान बदलामुळे पायाभूत सुविधांचे नुकसान होत आहे, कृषी उत्पादकता कमी होणे आणि उच्च विमा खर्च यासह महत्त्वपूर्ण आर्थिक परिणाम होत आहेत.
8. हे हवामान बदलाचे प्रभाव एकमेकांशी जोडलेले आहेत आणि एकमेकांना वाढवू शकतात, त्यामुळे गंभीर आणि संभाव्य आपत्ती जनक परिणाम हे होऊ शकतात.
9. हवामान बदलाचे हे परिणाम कमी करण्यासाठी आपण हरित गृह वायू उत्सर्जन कमी गरजेचे आहे, आणि होणार्‍या परिणामांशी जुळवून घेण्याची आवश्यक ती कृती करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Related posts