उस्मानाबाद  परंडा

श्रीमंतराजे प्रतिष्ठाणच्या वतीने “मी जबाबदार ” मोहीमेस सुरुवात.

डिजिटल पद्धतीने कोरोना जनजागृती

रणजीत पाटील – परंडा प्रतिनिधी.

नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद (भारत सरकार) संलग्नित श्रीमंराजे प्रतिष्ठाण कपिलापुरी व शंभूसेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कोरोना पार्श्वभूमीवर “मी जबाबदार” मोहीमेस सुरुवात करण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन परंडा तालुक्यात याबाबत मोठया प्रमाणात जनजागृती कार्य हाती घेण्यात आले आहे.”मी जबाबदार”या मोहिमेतून सोशल मीडियाच्या माध्यमातून डिजिटल पध्दतीने कोरोना जनजागृती करण्यात येत आहे. “मी मास्क वापरणार, सोशल डिस्टन्सिंग पाळणार,वेळोवेळी हात स्वच्छ धुणार” असा संदेश देण्यात येत आहे.

प्रतिष्ठाणच्या वतीने ७४५ नागरिकांनपर्यंत हा संदेश पोहचवण्यात आला आहे,तसेच शासन आदेशाचे व नियमांचे पालन करावे असे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा शंभुसेना महाराष्ट्र राज्य,उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष रणजीत महादेव पाटील यांनी सांगितले.

Related posts