उस्मानाबाद  वाशी

स्वछ भारत अभियान अंतर्गत प्लास्टिक कचरा संकलन मोहिमेचा शुभारंभ.

पुरुषोत्तम विष्णु बेले
उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी

वाशी – भारत सरकारच्या स्वछ भारत अभियान अंतर्गत नेहरू युवा केंद्र यांच्या माध्यमातून जिल्हा भरामध्ये प्लास्टिक कचरा संकलन ही मोहीम युवा मंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे.


वाशी तालुक्यातील मौजे तेरखेडा येथीला महात्मा बसवेश्वर मंदिरामध्ये बसवेश्वरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण व श्रीफळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व मंदिर परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला तसेच
ग्रामपंचायत परिसरात स्वछता तसेच प्लास्टिकचा कचरा संकलित करण्यात आला.

यावेळी विवेकानंद मंडळाचे सदस्य तसेच गावातील युवक रुपेश उमर्दंड, प्रतीक मोहिते,पौजल घुल,सोमनाथ उमर्दंड, कृष्णा पौल हे उपस्थित होते .

Related posts