Blog

हसणे व मनोरंजन जीवनाचे अविभाज्य अंग.

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय,तुळजापुर।जिल्हा उस्मानाबाद।

———————————————————————

हसण्यासाठी लिहिलेला एक सिरियस लेख!

आजचे युग हे विज्ञान युग आहे तंत्रज्ञानामुळे सर्व जण आपापल्या कामात व्यस्त आहेत तसेच आजच्या या कोरोणा महामारी च्या काळात खरी गरज आहे ती आपले आरोग्य, आपल्या परिवाराचे आरोग्य, सांभाळण्याची आरोग्य ही संपत्ती आहे संपत्ती पेक्षाही खूप मोठे ईश्‍वराने आपल्याला दिलेले धन आहे परंतु ते धन नाशिवंत आहे जास्त काळ टिकणारे नाही कधी ना कधी ते नष्ट होणारे आहे म्हणून येणारा दिवस अत्यंत आनंदात घालवणे उत्तम आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे मित्रांनो हसणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे

आरोग्य चांगले राहण्यासाठी आनंदी व हसत खेळत राहिले पाहिजे नेहमी उत्साही व सकारात्मक ऊर्जेने प्रफुल्लित राहिले पाहिजे त्यासाठी मनोरंजन व खळखळून हसणे खूप आवश्यक आहे हसणे म्हणजे कुणाच्या व्यंगावर, बोलण्यावर चिडवून हासणे नव्हे, तर एखाद्या झालेल्या विनोदावर, चर्चेवर ,संवादावर खळखळून हसणे होय खळखळून हसल्याने शरीराचा सर्वांग व्यायाम होतो मन आनंदी व प्रसन्न राहते त्यामुळे मनाची स्थिरता, एकाग्रता वाढते मनाची एकाग्रता खूप महत्त्वपूर्ण आहे मनाच्या एकाग्रते मुळे सर्व कामे आपोआप यशस्वी होतात

आज-काल हसण्यासाठी क्लास लावले जातात व काल्पनिक हसणे सुरू होते ज्यांच्या जीवनात हसणे नाही ते हसण्याचे क्लास लावतात व हसण्याचा केविलवाणे प्रयत्न करतात पाश्चिमात्य देशात असे क्लास मोठ्या प्रमाणावर चालतात त्यांच्याकडे हसण्यासाठी सुद्धा वेळ नसतो 24 तास आपल्या कामात व्यस्त असतात हसण्याचे ही काही प्रकार दिसून येतात कोणी गालातल्या गालात हसतात, कोणी स्मित हास्य करतात,कोणी आपले सम्पूर्ण बत्तीस दांत दिसतील असे हसतात म्हणूनतर गुरुजी वर्गात म्हणतात की अरे ,बत्तीशी काढू नका !तर कोणी खळखळून निखळ हसतात ज्या हसण्याने मनावरील ताण तणाव कमी होतो डॉक्टर व मानसोपचार तज्ञ देखील सांगतात हसण्याचे खूप मोठे फायदे आहेत

वर्तमान काळातील युवकांना विद्यार्थ्यांना मोबाईल लॅपटॉप या तंत्रज्ञानाने आकर्षित केले आहे इंटरनेटवरून अभ्यास ऑनलाईन क्लास यामुळे ते सतत बिझी असतात त्यांना मोकळा श्वास घ्यायला वेळच नाही मैदानावर जाऊन विविध प्रकारचे खेळ खेळणे, पळणे, उड्या मारणे, क्रिकेट, वॉलीबॉल, खो-खो, कबड्डी ,असे सर्व व्यायामाचे खेळ जवळपास बंद झाले आहेत व त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर शरीरावर होत असताना दिसून येत आहे जसे डोळ्याचे आजार, मानसिक अस्थिरता असणे, त्याचबरोबर इतरांशी बोलणे वाद-संवाद बंद झाले फक्त बोलणे ते मोबाईल वरच मॅसेज मोबाईलवरच! ना प्रत्यक्ष भेट ना संवाद तेव्हा अशा या कोरोणाच्या महामारी च्या काळात आपले आरोग्य टिकवण्यासाठी हसणे तर महत्त्वाचे आहे व हसणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे

हसायला पैसे लागत नाहीत, हसायला कोणाचे बंधन नाही, हसायला शासनाचा काही नियम नाही, हसण्यासाठी कुठला कायदा केलेला नाही ,ना कुठला टोल भरावा लागत नाही!टीव्ही घराघरातील आवडते, सर्वांच्या लाडाचे मनोरंजनाचे साधन आहे त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे व विनोदी मालिका कामातून वेळ काढून, विरंगुळा म्हणून बघितल्या पाहिजेत हास्य कवि कविता, हास्य वात्रटिका, विनोदी विचार, सुविचार ,म्हणी विनोदी एकांकिका ,विनोदी नाटके, व्यंगचित्रे ,विनोदी संवाद, टीव्हीवरील वेगवेगळ्या मालिका, उदा. तारक मेहता, क्या भाभी जी घर पर है ?हाफु की उलटं फलटण ,मॅडम सर, चला हवा येऊ द्या! कॉमेडी बुलेट ट्रेन ,अशा विविध हास्य मालिका आपण वेळोवेळी बघू शकतो व त्याचा आनंद घेऊ शकतो आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो नेहमी गंभीर विचार केल्याने मनावर ताण तणाव येतो व आपली विचार करण्याची शक्ती कमकुवत होते

मनावर ताण असताना आपण कुठलेही काम नीटनेटके व व्यवस्थित करू शकत नाही म्हणून आपले शरीर टिकवण्यासाठी मन प्रसन्न ठेवणे गरजेचे आहे आजच्या करुणा च्या या महामारी ने सर्वांचे जीवन उद्ध्वस्त केलेले आहे , करत आहे त्याचा मुकाबला करण्यासाठी हसत खेळत व मनोरंजन करीत आपले जीवन जगणे गरजेचे आहे आरोग्य टिकवण्यासाठी हसणे तर महत्त्वाचे आहेच कारण हसणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे म्हणून नेहमी हसत रहा प्रसन्न रहा सकारात्मक रहा।धन्यवाद🙏🏻🙏🏻

Related posts