तुळजापूर

शहापूर व काक्रंबा येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा.

तुळजापूर – तुळजापूर तालुक्यातील शहापूर व काक्रंबा येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले. काक्रंबा येथे शिवसेना सोशल मीडिया चे तालुकाप्रमुख चेतन बंडगर तर शहापूर येथे विभागप्रमुख विकास सुरवसे व युवासेना शाखाप्रमुख सचिन मोरे यांनी सर्व मित्रपरिवार व शिवसैनिक बांधवांसह स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

या कार्यक्रमात सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिक बांधव उपस्थित होते.

Related posts