तुळजापूर

कोजागिरीच्या प्रसन्न चंद्र आणि लातूर मार्ग दिव्यांनी तुळजापूर उजळले

साईनाथ गवळी,
तुळजापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी.

तुळजापूर ते लातूर रोडवर कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने महामार्ग प्रशासनाने दिव्यांचा झगमगाट करून कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने सोलापूरकरांना सुखद अनुभव दिला आहे दिव्यांच्या या झगमगाटामध्ये प्रत्यक्ष कोजागिरीचा चंद्र देखील अवतरला आहे.

तुळजाभवानी देवीच्या कोजगिरी पूर्णीमा यात्रेच्या निमित्ताने तुळजापूर ते लातूर या चार पदरी महामार्गाचे काम पूर्ण झाले ा महामार्गावर तुळजापूर शहराच्या सर्व भागात येणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेले दिवस नवरात्र आणि कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात रस्त्यावरील पथदिवे तुळजापूर शहराचे वैभव वाढवत आहे दिव्यांच्या झगमगाटात मुळे संपूर्ण लातूर रोडवर प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे या मार्गावरील बाजारपेठांमध्ये देखील यामुळे आनंदाचे वातावरण दिसून आले. या मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती, भात संशोधन केंद्र, तालुका कृषी कार्यालय, तुळजापूर बस स्थानक, या प्रमुख संस्था असून मार्गावर जनतेचे यातायात मोठ्या प्रमाणावर आहे

Related posts