महाराष्ट्र

निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी दाखले देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

मुंबई- मराठा आरक्षण संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या नऊ दिवसापासून जालना येथे मनोज जिरंगे यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केले आहे, यावर आता राज्य शासनाने तोडगा काढला आहे. तीन पिढ्यांच्या आधीचे कुणबी रेकॉर्ड्स असलेल्यांना सरकार कुणबी म्हणून मान्यता देणार, असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. कुणबी रेकॉर्डसचे नियम ठरवण्यासाठी माजी न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती एका महिन्यात ‘कुणबी’ दाखल्यांबाबतचा निर्णय लागणार आहे, अशी माहिती सीएम शिंदे यांनी दिली.

Related posts