Blog

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीदिन.

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय,तुळजापुर।जिल्हा उस्मानाबाद।

==================================================================================================

आज दहा मार्च शिक्षण क्षेत्रातील आधुनिक काळातील सरस्वती, ज्ञानज्योती, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी म्हणजेच स्मृतिदिन होय आजच्या या स्मृतिदिनी सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन! जीवनात शिक्षणाला खूप महत्त्वाचे स्थान आहे, नव्हे या आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान युगात शिक्षण हेच जीवन होऊन बसलेले आहे आज आपण पाहातो महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर कार्य करताना दिसून येतात त्याचे मुख्य श्रेय जाते ते सावित्रीबाई फुले व त्यांचे पती महात्मा ज्योतीराव फुले यांना. ज्या काळात समाजाला शिक्षणाचा कसलाही गंध नव्हता ,सर्व समाज अज्ञान, अंधकार, अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलेले होते इंग्रजी जुलमी राजवट असताना एका बाजूने सर्व असहकारी समाज एका बाजूला तर मनामध्ये नवीन उमंग, नवीन स्वप्न शिक्षणाचे घेऊन भरारी मारण्यासाठी तयार असलेल्या सावित्रीबाई फुले त्यांनी अशा समाजाला न जुमानता आपल्या पतीच्या विचारात आपले विचार मिसळून अज्ञानाच्या विरुद्ध लढण्यास तयार झाले व 1 जानेवारी 1948 मध्ये पुणे येथे भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरुवात केली

सर्वप्रथम त्यांच्या शाळेत दोन ते तीन मुली येत होत्या त्याही भीत-भीत सावित्रीबाई फुले व त्यांच्या सहकारी फातिमा शेख या त्यांना शिकवण्याचे काम करत असत घरून येताना एका पिशवीमध्ये दोन साड्या त्या घेऊन येत असत कारण रस्त्यातुन येताना त्यांच्या अंगावर शेण व चिखल फेकण्यात येत असे, त्यांचा अवमान अपमान केला जात असे, त्यांचा मानसिक छळ केला जात असे परंतु आशा समाजाला न जुमानता त्या खंबीर पणाने मुलींना शिकवण्याचे कार्य करत असत हा त्यांचा धाडसीपणा आजच्या नविन पिढीने घेतला पाहिजे शिक्षण क्षेत्रात प्रामुख्याने सुर्यासारखे तेजस्वी तळपणारे कार्य सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी केलेले आहे फक्त समाजाचाच विरोध होता असे नाही, तर आपल्याच घरच्या नात्यांनी त्यांना घराबाहेर काढले होते कशासाठी तर महिलानी शिक्षण घेणे, शाळेत जाणे हे पाप आहे महिलांनी घराचा उंबरठा ओलांडू नये, हा फक्त पुरुषांच्याच अधिकार आहे महिलांनी फक्त चूल आणि मूल सांभाळावे इतर क्षेत्रात महिलांनी। हस्तक्षेप करु नये महिलांनी आपल्या घराचा उंबरठा ओलांडून नये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अशा चालीरिती परंपरा यांचा बारकाईने अभ्यास करून सर्व कुप्रथा दूर करण्याचा आटोकाट पणे प्रयत्न केला उदाहरणार्थ सती प्रथा, केशवपन, विधवा विवाह, बाल विवाह, या कार्यासाठी त्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला समाजातील काही कर्मठ लोकांनी त्यांना खूप त्रास दिला

ज्या कार्याची सुरुवात शून्यातून होते, त्यांना हरण्याची भीती नसते अशा संघर्षातून त्या पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका होण्याचा मान त्या काळी मिळवला होता प्रचंड ऊर्जा शक्ति, सकारात्मक तेचे बळ घेऊन शिक्षणाची वाटचाल केली पण— आज दुःख या गोष्टीचं वाटतं की आजच्या या व्यवस्थेत त्यांच्या पहिल्या पुणे येथील महिला शाळेकड़े ,शाळेचे ठिकाण दुर्लक्षित होत आहे ज्यांनी जगाला शिकवले, जगाला शिक्षणाचा महामंत्र दिला तीच शाळा आज दुर्लक्षित झालेली दिसून येते यापेक्षा मोठे दुर्दैव ते आपले कोणते! समाजाच्या तळागाळातील महिला पर्यंत शिक्षणाचा प्रकाश पोहचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सावित्रीबाईंची श्रेष्ठता ही शब्दात वर्णन करता येणार नाही अंधाऱ्या काळोखातून एका छोट्या पणती ने आवाज द्यावा आणि भयंकर अशा अज्ञानरूपी अंधकाराला चिरत, सूर्यासारखा ज्ञानाचा प्रकाश ,स्वाभिमान, स्वावलंबी पणा ,मनाचा कणखरपणा ,धाडसीपणा समाजातील महिलांना शिकवावा एक अद्भुतच कार्य होय!

विद्येविना मती गेली ,मतीविना नीती गेली, निती विना वित्त गेले, वित्त विना शुद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने घडले एका अडाणीपणामुळे ,अज्ञानामुळे, किती अनर्थ घडतात याचे प्रत्यक्ष उदाहरण महात्मा फुले यांनी मांडले आहे विद्या, ज्ञान शिक्षण घेतल्याने एवढे सगळे अनर्थ टळतात शिक्षणाने माणूस माणसात येतो माणूस घडतो व खऱ्या शिक्षणाने सुसंस्कारी समाज घडतो व अहंकाराचा नाश होतो हेच धोरण सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी समोर ठेवले व समाजकार्याला सुरुवात केली समाजातील उच्च नीचता, गरीब-श्रीमंत, जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद, वर्षानुवर्षे समाजाच्या मानगुटीवर बसलेला अडाणीपणाचा राक्षस ,अहंकार रुपी राक्षस नष्ट करण्याचा प्रयत्न सावित्रीबाईंनी केला व त्यात शेवटी त्यांना खूप मोठे यश आले आज आधुनिक काळात प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर कार्य करणाऱ्या महिला आपल्याला दिसून येतात

शिक्षण क्षेत्र, कला क्रीडा व विज्ञान संशोधन शेती वनीकरण ,परिवहन वैद्यकीय , औद्योगीकरण हे खऱ्या अर्थाने त्यांचेच यश आहे परकीय सत्ता इंग्रजांची गुलाम शाही हुकूमशाही कडक दंडक, त्यांच्याबद्दल बोलण्याची कोणाची हिंमत नसे देशद्रोही म्हणून त्यांना शिक्षा केली जात असे अशा काळात त्यांनी धाडसीपणा ने शिक्षणाचे कार्य हाती घेतले व ते कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी अतुलनीय कामगिरी केली अशा महान सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन

पुनश्च एकदा स्मृतिदिनानिमित्त सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन!

Related posts