उस्मानाबाद  तुळजापूर

जाणता राजा –शिवबा ! ————————————–

महाराष्ट्राच्या अस्मितेचा
मान बिंदू होता एकच राजा शिवबा! जनतेचा कल्याणकारी धर्मनिरपेक्ष कार्य करणारा राजा शिवबा! अन्याय अत्याचाराला मोडीत काढत परकीय स्त्रीला माता माणणारा राजा शिवबा! गनिमी कावा रचून भल्याभल्यांना हातघाईला आणणारा राजा शिवबा! स्वाभिमानी’ जिद्दी ;मुत्सद्दी मा साहेबांचं वचन पाळणारा, ‘मावळे म्हणजे ज्यांचे जीव की प्राण असा राजा शिवबा! जाती-धर्म ,लहानथोर, भेदाभेद न करता सर्वधर्म समभावाने सर्वांना समान न्याय देणारा राजा शिवबा! शुन्यातून महाराष्ट्राची निर्मिती करणारा व आपल्या बाल मावळ्या समवेत रायरेश्वराच्या मंदिरात करंगळी कापून हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारा राजा शिवबा!


जनतेच्या मना मनात,
महाराष्ट्राच्या कणा कनात
शेतकरी’ कामगा’र मजूर यांच्या कार्याला न्याय देऊन सर्वांचे दुःख जाणणारा जाणता राजा म्हणजे शिवबा!
जाणता राजा म्हणजे शिवबा!

कवि

देविदास पांचाळ सर
श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय,तुळजापुर जिल्हा उस्मानाबाद।

Related posts