अक्कलकोट

खेडगी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

अक्कलकोट –

सी. बी. खेडगी महाविद्यालयात भारताचा प्रजासत्ताक दिन कोविड 19 च्या सर्व नियमांचे पालन करत मोठ्या उत्साहात साजरा झाला. संस्थेचे चेअरमन शिवशरण खेडगी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मंचावर नगराध्यक्षा शोभाताई खेडगी, सेक्रेटरी सुभाष धरणे, व्हा. चेअरमन अशोक हारकूड, संचालक श्रीशैल भरमशेट्टी, संचालिका धरणे, प्राचार्य डॉ. जी. एस. धबाले, उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय फुलारी, पर्यवेक्षिका वैदेही वैद्य उपस्थित होते.

एन्. सी. सी. छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी लेफ्टनंट डॉ. भैरप्पा कोणदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिमाखदार संचालन केले. यावेळी विविध संघटनांकडून पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. वैदेही वैद्य, प्रा. संध्या इंगळे डॉ. गुरुसिद्धय्या स्वामी, यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या मंथन या मुखपत्राचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला कॉन्फरन्स किट देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य समन्वयक डॉ. इफ्तेकार खैरदी, समन्वयक प्रा. विलास अंधारे, डॉ. शिवराया अडवितोटे, प्रा. संध्या परांजपे, डॉ. गणपतराव कलशेट्टी, प्रा. दत्तात्रय बिराजदार, प्रा. मछिंद्र रूपनुर, प्रा.निलप्पा भरमशेट्टी, डॉ. सौदागर काळे, डॉ. चौडप्पा कांबळे, डॉ. किशोर थोरे, प्रा. प्रकाश सुरवसे, प्रा. दयानंद कोरे, प्रकाश सनकळ, प्रा. सिध्दाराम पाटील, प्रा. विजया कोन्हाळी, आदींनी परिश्रम घेतले.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.

Related posts