दक्षिण सोलापूर

मंद्रुप हद्दीतील जनतेच्या सहकार्याने गुन्हेगारीवर करडी नजर ; मंद्रूपमध्ये पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांचा सपत्नीक सत्कार 

अशोक सोनकंटले
दक्षिण सोलापूर विशेष प्रतिनिधी

मागील दोन वर्षाच्या कालावधीमध्ये मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आपण प्रयत्न केला. प्रसंगी कठोर निर्णय घेऊन अवैध व्यवसायिकांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत,येथील जनतेचा पोलिसांना नेहमीच साथ मिळाली आहे. त्यांच्या प्रेम व सहकार्य नेहमीच आठवणीत राहील असे असे भावोदगार नूतन पोलीस निरीक्षक बढती मिळालेल्या संदीप धांडे व सोनाली पाटील – धांडे यांनी यावेळी बोलताना काढले.पोलीस निरीक्षक धांडे यांचे नुकतेच पोलीस निरीक्षक पदी बढती मिळून त्यांची मुंबई येथे बदली झाली आहे त्या निमित्ताने मंद्रूप पोलीस ठाण्याच्यावतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक डाॅ. नितीन थेटे यांनी संदीप धांडे व सोनाली पाटील- धांडे यांचा सपत्नीक सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगूवाले उपस्थित होते.

संदीप धांडे यावेळी म्हणाले की, महाराष्‍ट्र- कर्नाटक सीमावर्ती भागात हे पोलीस ठाणे असल्याने जिल्ह्यातील एक संवेदनशील पोलिस ठाणे म्हणून ओळखले जाते, छोट्या-मोठ्या भांडणात दाखल होणारे गुन्हे समोपचाराने ज्या त्या स्थानिक नेत्यांच्या मध्यस्थीने मिटवले. विविध सामाजिक संघटना, जनता, व्यापारी बांधवांनी नेहमीच मोठे सहकार्य केले. यामुळे आपल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे तसेच त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले.आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण आपण पाच वर्षे कार्यरत होतो. या कालावधीमध्ये जनतेने केलेल्या सहकार्यामुळेच आपल्याला या जिल्ह्यांमध्ये यशस्वीपणे कारकीर्द पूर्ण करता आली.येथील जनतेचे प्रेम कायम सोबत राहतील.
यावेळी  सपोनि  डाॅ.नितीन थेटे म्हणाले धांडे पती-पत्नी यांनी मंद्रूप पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून यशस्वीरीत्या काम केलेले आहे. आपणही आपले कार्यकाल त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून यशस्वीरीत्या पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.

पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर संदीप धांडे व सोनाली पाटील-धांडे यांचा मंद्रूप पोलीस ठाणे व जनतेतर्फे सत्कार करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक डाॅ. नितीन थेटे,यावेळी पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगूवाले उ व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Related posts