उस्मानाबाद  तुळजापूर

काटगाव जि. प. मतदारसंघात शिवसेना (उबाठा) पक्षाच्या आढावा बैठका.

तुळजापूर – शिवसेना पक्षप्रमुख, #मा_उद्धवजी_ठाकरे साहेब, यांच्या आदेशानुसार, संपर्कप्रमुख श्री. सुनिलजी काटमोरे साहेब, सहसंपर्कप्रमुख श्री. नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, धाराशिवचे लोकप्रिय खा. ओमदादा राजेनिंबाळकर तसेच जिल्हाप्रमुख आ. कैलासदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली,

तुळजापूर तालुक्यामधील #काटगाव जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना (उबाठा) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका पार पडल्या. या दौऱ्यादरम्यान सांगवी (मगर), सुरतगांव, तामलवाडी, पिंपळा (खु), पिंपळा (बु), देवकुरूळी, काटगाव, खडकी, धोत्री अशा सर्व गावांना भेटी देण्यात आल्या. या बैठकामध्ये तेथील स्थानिक समस्या, अडि-अडचणी जाणून घेण्यात आल्या. पक्ष-बांधणीवरील समस्या, पक्षाचे कार्य अशा सर्व बाबींचा आढावा घेण्यात आला. यानंतर पक्षप्रमुख उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा सर्व शिवसैनिक पेटून उठेल आणि जोमाने कामाला लागेल असा निर्धार उपस्थित सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आला. “#स्व_बाळासाहेबांचे” स्वप्न करू साकार, तुळजापूर विधानसभेवर विजयी करू “#शिवसेनेचाच_आमदार…!” असा नारा यावेळी तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी यांनी उपस्थित शिवसैनिकांसह दिला. पक्षबांधणीसाठी तसेच जनसेवेसाठी आपण वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कायम तत्पर असल्याचे यावेळी तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी यांनी उपस्थित शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले.

यावेळी तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी यांच्यासह सर्व स्थानिक शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शेकडो शिवसैनिक बांधव उपस्थित होते.

Related posts