भारत

कर्नाटकात २७ एप्रिलपासून १४ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने उद्या २७ एप्रिलपासून पुढील १४ दिवस राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. उद्या रात्री ९ वाजल्यापासून राज्यात कर्फ्यू लागू होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.
अत्यावश्यक सेवांना सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. सकाळी १० नंतर दुकाने बंद राहतील. केवळ बांधकाम, उत्पादन आणि कृषी क्षेत्रांशी संबंधित व्यवहार सुरू ठेवण्यास लॉकडाऊन काळात परवानगी देण्यात आहे. सार्वजनिक वाहतूक बंद राहील, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी म्हटले आहे.
५१० पोलिस बाधित
कर्नाटकातील ५१० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ३०२ एका बंगळुरातील आहेत. सध्या ४७० पोलिस घरीच क्वारंटाईन आहेत. तर ४० पोलिस विविध रुग्णालयांत दाखल आहेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये चार पोलिसांचा मृत्यू झाला. प्राथमिक आणि द्वितीय संपर्कात आलेल्या पोलिसांची कोरोना चाचणी केली जात आहे. पोलिस खात्याने दिलेल्या माहितीनुसार १५,८ ०० कर्मचार्‍यांना कोरोना लस दिली आहे. यापैकी ९,७०० जणांना दुसर्‍यांदा लस देण्यात आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ९,६९५ पोलिसांना बाधा झाली होती. दुसर्‍या लाटेत १ एप्रिलपर्यंत २९५ सुरक्षा कर्मचार्‍यांना कोरोनाबाधा झाल्याचे सांगण्यात आले होते. दुसर्‍या लाटेत यामध्ये १० टक्के वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

Related posts